याबाबत अनोळखी इसमाविरुद्ध तालुका पोलिसात जखमी वर्षा भाऊसाहेब गरदडे (वय- ३२, गाताचीवाडी) या महिलेंनी तक्रार देताच अनोळखी इसमावर मंगळवारी गुन्हा नोंदला आहे.
सोमवारी हॉटेलवर फिर्यादी व तिची बहीण रेश्मा या दोघीनी काम आटोपून रात्री नऊच्या सुमारास घरी जात होत्या. गावाजवळील चौकात हॉटेलसमोर अनोळखी दुचाकीवर येऊन महिलेकडे पहात होते. कानिफनाथ मंदिराच्या उतारावरून जात असताना महिलेंनी मोबाईलच्या बॅटरीच्या उजेडात एकास पहाताच त्याने येऊन लाकडी दांडक्याने व पाठीवर मारले. फिर्यादीची बहीण रेश्माच्या गळ्यास चाकूने मारहाण करत गळ्यातील अर्धवट २० ग्रॅमचे मंगळसूत्र तोडून घेऊन पसार झाले. गावाजवळील बायपासवर हा गोंधळ सुरू असताना जखमीचे पती दीर व इतरांनी येऊन दोघींना खाजगी दवाखान्यात दाखल केले. पुढील तपास तालुका पोलीस करीत आहेत.