शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election 2024: जातीय दुभंगाला सोयाबीनचा तडक! मराठवाड्यातील लढतींचा लक्ष्यवेध
2
Maharashtra Election 2024: शेवटचा ‘मास्टर स्ट्रोक’! ‘सुपर संडे’साठी काँग्रेस अन् भाजप नेत्यांचा विदर्भात तळ
3
आजचे राशीभविष्य - १७ नोव्हेंबर २०२४, आर्थिक लाभाचा़ दिवस, घरात शांतता व आनंदाचे वातावरण राहील
4
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
5
तोंडातून उसळे शब्दांचे हे बाण, वेडात प्रचारी वीर दौडले सात...
6
Savner Assembly Election 2024: सख्ख्या भावांच्या लढतीत वहिनी मारणार का बाजी?
7
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
8
मणिूपरच्या जिरिबाममध्ये तिघांचे मृतदेह सापडल्याने प्रचंड तणाव; मंत्र्यांच्या घरासमोर निदर्शने
9
भारत-चीनमधील तणाव कमी होणे आवश्यक; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांचे मत
10
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
11
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
12
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
13
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
14
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
15
बनावट शस्त्र, परवाना रॅकेटचा अहिल्यानगर पोलिसांकडून पर्दाफाश; जम्मू काश्मिरमध्ये नऊ जणांना अटक
16
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
17
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
18
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
19
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
20
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात

जीपच्या धडकेत दोन युवक ठार

By admin | Published: July 20, 2014 12:35 AM

मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार

सोलापूर : भरधाव वेगात निघालेल्या क्रुझर या ट्रॅक्सची जोरदार धडक बसल्याने मोटरसायकलवरील दोघे जागीच ठार झाले. पुणे महामार्गावरील बाळेनजीक असलेल्या बालाजी हार्डवेअरसमोर शनिवारी मध्यरात्री म्हणजे साडेबारा वाजता हा अपघात घडला.अतुल शशिकांत गंभीरे (वय-३०, रा. आसरा हौसिंग सोसायटी, सोलापूर) आणि गणेश नेताजी सुरवसे (वय-३२, रा. कल्याणनगर, दत्त मंदिरामागे, जुळे सोलापूर) अशी जागीच मरण पावलेल्यांची नावे आहेत. हे दोघे एमएच-१३/एआर-५९१६ या मोटरसायकलवरून जेवण करण्यासाठी पुणे रोडवरील एका हॉटेलात गेले होते. जेवण आटोपून घराकडे परतत असताना बाळेनजीक मोटरसायकलला समोरून येणाऱ्या ट्रॅक्सने (एमएच-१३/एझेड-७८३५) जोरदार धडक दिली. त्यात दोघे जागीच ठार झाले. अमित शशिकांत गंभीरे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ट्रॅक्सचालकावर फौजदार चावडी पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे. तपास सपोनि साळुंखे करीत आहेत. मृत गणेश सुरवसे याच्या पश्चात आई, वडील, पत्नी, एक मुलगा, एक मुलगी तर अतुल गंभीरे याच्या पश्चात आई, दोन भाऊ, पत्नी, एक मुलगी असा परिवार आहे. --------------------------जेवण जीवावर बेतले !दोघे मोटरसायकलवरून पुणे महामार्गावरील एका हॉटेलात जेवायला गेले. महामार्गावरील जडवाहनांचा अंदाज न आल्याने अपघात झाला.