भीमानगर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणात पुणे जिल्ह्यातील वरच्या धरणातून येणाºया २४ हजाराच्या विसर्गामुळे उजनी धरण प्लसमध्ये आले आहे. सध्या १३ टक्के इतके पाणी आहे. दरम्यान, भीमा नदीतील विसर्ग बंद करण्यात आला आहे.
बुधवारी सकाळी ६ वाजता दौंड येथून येणारा विसर्ग ४६ हजार २२७ क्युसेक्सने सुरु होता. दुपारी १२ वाजता बंडगार्डन येथून येणारा विसर्ग ११ हजार ७३१ क्युसेक्स होता तर दौंड येथून येणारा विसर्ग ३९ हजार ९८१ क्युसेक्स एवढ्यावर स्थिर राहिला. उजनी धरण मंगळवारी ४ वाजता मायनसमधून प्लसमध्ये आले. २४ तासांत धरणात १०.१२ टक्के पाणी आले.
पुणे जिल्ह्यातील खडकवासला धरण साखळीतील मुठा सिंहगड खोरे तसेच घाटमाथ्यावरील भीमाशंकर, आंबेगाव या भागात आठवड्यापासून दमदार पाऊस सुरू असून, उजनीच्या वरील १९ धरणांच्या पाणलोट क्षेत्रात सोमवारी सकाळी ६ ते मंगळवारी १७ जुलै रोजी सकाळी ६ या २४ तासांत तब्बल १ हजार ५७१ मि. मी. पावसाची नोंद झाली आहे. मंगळवारी १७ जुलै रोजी दुपारपर्यंत धरण क्षेत्रातील पाऊस कमी झालेला असला तरी बुधवारी १८ जुलै सायंकाळी ६ वाजेपर्यंत उजनी धरणात दौंड येथून येणारा विसर्ग चालूच आहे.
दरम्यान, उजनी धरणात येणाºया विसर्गात घट होत असून, १८ जुलै रोजी दुपारी १२ वाजता बंडगार्डन येथून येणारा विसर्ग ११ हजार ७७८ क्युसेक्स तर दौंड येथून येणारा विसर्ग ३९ हजार ७३१ क्युसेक्स होता तर ४ वाजता उजनी धरणात दौंड येथून विसर्ग ३८ हजार १११ क्युसेक्स वेगाने पाणी उजनी धरणात येत होते. अजूनही बंडगार्डन व दौंड येथून येणारा विसर्ग चालूच असून, बुधवारी सायंकाळी ६ वाजता बंडगार्डन येथून येणारा विसर्ग ८ हजार ४३६ क्युसेक्स सुरू होता तर दौंड येथील विसर्ग ३४ हजार १५८ क्युसेक्स सुरु होता.
दृष्टिक्षेप
- - एकूण पाणीपातळी :४९१.७८ द. ल. घ. मी.
- - एकूण पाणीसाठा : १९३६.२८ द. ल. घ. मी.
- - उपयुक्त पाणीसाठा : १५३.४७ द. ल. घ. मी.
- - एकूण टीएमसी : ६९.०८
- - एकूण उपयुक्त टीएमसी ५.४२
- - टक्केवारी : १३ टक्के
- - बंडगार्डन विसर्ग : २४ हजार क्युसेक्स
- - दौंड विसर्ग : ३४ हजार १५८ क्युसेक्स
- - भीमा नदीतील विसर्ग बंद