सोलापूर : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील एका मोठ्या नेत्याचा फोन टाळला होता. किती वेळा हे फोन करतात असे स्वीय सहाय्यक कडे बोलून बसविले होते असा गौप्यस्फोट भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सोलापुरात केला.
भाजपाच्या शहर कार्यकर्त्यांची चंद्रकांत पाटील यांनी शुक्रवारी संवाद साधला. यावेळी ते नगरसेवकांना लोकांशी संवाद कसा ठेवावा, संवाद नसेल तर काय होते त्याचे महत्त्व पटवून देत होते. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोठ्या नेत्यांचा फोन टाळला होता. या नेत्याचे मी नाव सांगणार नाही. मात्र या घटनेमुळे महाआघाडीत तणाव निर्माण झाला होता, असेही त्यांनी सांगितले.