कल्लप्पावाडीत अन्नछत्राला सुरुवात
उडगी : अक्कलकोट तालुक्यात कल्लप्पावाडी येथील सोमेश्वर अमोगसिद्ध सिद्धाश्रम येथे वेळ अमावस्येच्या मुहूर्तावर भाविकांसाठी अन्नछत्र सुरु करण्यात आले. मदगोंड महाराज यांच्या हस्ते अन्नदानाला प्रारंभ करण्यात आला. यावेळी जे. एम. कोरबू, बसवराज महाराज, बिळीयानसिद्ध पुजारी, अगरखेड सिद्धाप्पा पुजारी, महेश जानकर, संजय पांढरे, ईरपा डोणे, कोंडीबा बंडगर, अशोक कोकरे, जयकुमार उपस्थित होते.
लांबोटील आरओ प्लांट बसवण्याची मागणी
लांबोटी : मोहोळ तालुक्यात अर्जुनसोंडमधील शिवाजीनगर येथे पिण्याचे पाणी (आरओ ) सोय नसून तेथे (आर ओ) नाविन बसवण्याची मागणी नागरिकांनी केली आहे, गावाला शुद्ध पाणी मिळाल्यास साथीचे आजार कमी होणार आहेत. या आरओ प्लांटच्यर माध्यमातून ग्रामपंचायतीला महसूल मिळणार आहे.
सावळेश्वर स्मशानभूमी स्वच्छतेची मागणी
लांबोटी : सावळेश्वर (ता. मोहोळ) येथील स्मशानभूमीत मोठ्याप्रमाणात काटेरी झाडे वाढली आहेत. ती काढण्याची मागणी नागरिकातून होत आहे. याशिवाय या स्मशानभूमीची दुरावस्था झाली आहे. तसेच सर्वत्र अस्वच्छता दिसत आहे. स्वच्छता करण्याची मागणी होत आहे.