नासीर कबीर
करमाळा : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाच्या पाणवठ्यावर पक्ष्यांसाठी पोषक असे वातावरण असल्याने गेल्या ४२ वर्षांपासून उजनी धरणाच्या १४ हजार चौरस किलोमीटरच्या पाणलोट क्षेत्रावर परदेशातून हजारो मैल प्रवास करून आलेल्या स्थलांतरित पक्ष्यांसाठी तीर्थक्षेत्र बनले असून, उजनी पाणलोट क्षेत्र पक्षी अभयारण्य बनायला हवे, याचीच प्रतिक्षा आहे.
उजनी जलाशयाच्या करमाळा तालुक्यातील कोंढारचिंचोली, टाकळी, खातगाव, कात्रज, वांगी, कुुंभारगाव, डिकसळ या परिसरात उपलब्ध होणारे खाद्य, जलाशयातील मासे, वनस्पतीचे बी, फळे, देठे, पाने व खोड, शैवाळ यावर अनेक पक्षी अवलंबून आहेत. सुमारे २५० हून अधिक प्रजातींपैकी बहुतांशी पक्षी वर्षभर उजनी जलाशयाच्या परिसरात आढळतात. उजनी जलाशय स्थानिक पक्ष्यांबरोबरच परदेशी पक्ष्यांचेही आकर्षण ठरले आहे. प्रत्येक वर्षी हिवाळ्याच्या प्रारंभी शेकडो प्रकारचे पक्षी स्थलांतर करून उजनी पाणलोट क्षेत्रात येऊन थडकतात.
युरोप, उत्तर अमेरिकासह अंटार्टिका प्रदेश, रशिया, मंगोलिया, कझाकिस्तान, सायबेरिया येथून हजारो मैल अंतर पार करून बदकांसह विविध करकोचे, रोहित फ्लेमिंगो, नदीसुरम्य, समुद्रपक्षी, तुतुवार, पाणटिळवा, भोरड्या, बगळे आदी परदेशी पक्षी उजनी धरण परिसरात गर्दी करतात. पट्टकंदब हंस, कदंब हंस, परी बदक, चक्रवाक, बाड्डा बदक व विविध हंस पक्षी, स्थलांतरित करून आलेले हिवाळी पाहुणे पक्षी उष्णतेच्या ४० अंशांच्या पाºयाचा अनुभव घेऊन पावसाळ्याच्या प्रारंभी आपल्या मूळस्थानी मार्गस्थ होतात.
युुरोप व अमेरिका खंडात होणाºया हिमवृष्टीमुळे या पक्ष्यांना भूक भागविणे कष्टप्राय होते. हिमालयाच्या पलीक डील मंगोलिया, रशिया, सायबेरिया, अफगाणिस्तान व मध्य आशियातील अनेक राष्ट्रांमध्ये हिवाळ्यात कडाक्याच्या थंडीमुळे पक्ष्यांच्या शरीरक्रियेत कमालीचा बदल होतो आणि याच काळात भारतात विशेषकरून महाराष्ट्रात या पक्ष्यांना अनुकूल वातावरण तयार होते. उजनी धरणातील पाणी उन्हाळ्यात कमी होत असल्याने कीटक,मासे,मृदुकाय प्राणी,बेडकाची पिल्ले आदी खाद्यान्न विपुल प्रमाणात उपलब्ध होत असल्याने काही पक्षी तर आपल्या वंशवाढीसाठी सुध्दा परदेशातून इकडे वाºया करतात़विपुल पाणी,मुबलक खाद्यान्न,लपण्यासाठी व विश्रांतीसाठी सुरक्षित जागा उजनी परिसरात आहे.
हिमालय व पूर्वोत्तर राज्यांतून उजनी काठावर माळरानाचे पक्षी म्हणून नीलकंठ, थिरथिºया , धनछुवा, अबलक धनेश, पाकोळ्या, पाणघारी, मग्धबलाक, चित्रबलाक, पांढºया मानेचे करकोचे, नळया तुुतुवार, कांचन हळदया, मलकोव्हा हे स्थानिक स्थलांतरित पक्षी उजनी जलाशयाच्या पाणलोट क्षेत्रात मुक्तपणे वावर करतात.
उजनी पाणलोट क्षेत्र पक्षी अभयारण्य बनावे...- उजनी पाणलोट क्षेत्रास पक्षी वैशिष्ट्यांची परंपरा लाभलेली असून, धरण काठावरील भौगोलिक व प्राकृतिक परिस्थिती तसेच पक्ष्यांसाठी पोषक वातावरण या कारणामुळे अनेक वर्षांपासून उजनी धरण काठावरील परदेशी व स्थानिक पक्ष्यांचा वावर आहे़ केंद्र व राज्य सरकारने उजनी पाणलोट क्षेत्र पक्षी अभयारण्य बनवावे, अशी मागणी अभ्यासक प्रा.डॉ.अरविंद कुं भार यांनी केली आहे.