भीमानगर : २३ टक्क्यांवर गेलेले उजनी धरण आठवडाभरात उपयुक्त ३५ टक्के झाले. म्हणजे ५८ टक्के पाणीसाठा जुलै महिन्यात उजनीत जमा झाला आहे. पुणे जिल्ह्यातील घाटमाथ्यावर पावसाने विश्रांती घेतल्याने मुळा, इंद्रायणी, तसेच खडकवासला इथून बंडगार्डनमधे येणारा विसर्ग घटल्याने दौंडमधून येणारा विसर्ग अवघा १२००० क्युसेकवर आला आहे.
उजनीच्या वर म्हणजे पुणे जिल्ह्यातील १९ धरणांपैकी ११ धरणं जवळपास ८० टक्क्याच्या आसपास भरली आहेत. अगामी काळात या धरणांमधून जास्त झालेले पाणी उजनीमध्ये येणार आहे. उजनीच्या पाणी पातळीत झपाट्याने होणारी वाढ आता संथ गतीने होत आहे.
रविवारी सायंकाळी ३३ टक्क्यांवर असणा-या उजनीच्या टक्केवारीत सोमवारी दिवसभरात फक्त तीन टक्क्यांनी वाढ झाली आहे. रविवारी सायंकाळी सहा वाजता दौंडमधून २५४०७ क्युसेकने येणारा पाण्याचा विसर्ग सोमवारी सकाळी ६ वाजता १७ हजार ९९६ क्युसेकवर आला. सायंकाळी सहा वाजता १२३०१ वर आला. त्यामुळे उजनीची वाढ आता संथगतीने होत आहे.
-----------------
उजनीची सद्य:स्थिती
एकूण पाणी पातळी ४९३.४५० मीटर
एकूण पाणी साठा २३३७.९८ दलघमी (टीएमसी ८२.५६)
उपयुक्त पाणी साठा ५३५.१७ दलघमी (टीएमसी १८.९०)
टक्केवारी ३६ टक्के
उजनीत येणारा विसर्ग बंडगार्डन १३८३० क्युसेक
दौंड १६८६७ क्युसेक
----
भीमा खोऱ्यातील धरणाची सोमवारची स्थिती
१) पिंपळगाव ०.० टक्के
२) माणिकडोह ३२.७४ टक्के
३) येडगाव ६५.१० टक्के
४) वडज ४९.३० टक्के
५) डिंभे ६५.१२ टक्के
६) चासकमान ७६.०५ टक्के
७) भामा आसखेड ७९.१० टक्के
८) आंध्रा प्रकल्प १०० टक्के
९) वडिवळे ८४.२१ टक्के
१०) मुळशी ६६.७० टक्के
११) पवना ८०.५१ टक्के
१२) कासारसाई ८५.०६ टक्के
१३) टेमघर ६१.६७ टक्के
१४) वरसगाव ७३.३० टक्के
१५) पानशेत ८४.०६ टक्के
१६) खडकवासला ९८.०१ टक्के
१७) कळमोडी १०० टक्के