- राजशेखर शिवदारे, चेअरमन, श्री स्वामी समर्थ सूतगिरणी, वळसंग
---
महाविकास आघाडीच्या सरकारने पूर्वी घेतलेला निर्णय बदलला आणि नवीन सुधारित आदेश काढला. या निर्णयाचे स्वागत करतो. आ. प्रणिती शिंदे, आ. सिद्धाराम म्हेत्रे यांनी सत्तेत असतानाही सरकारला निर्णय बदलण्यास भाग पाडले. त्यांचे अभिनंदन. आता तरी आमच्या दक्षिण सोलापूर तालुक्यावर अन्याय होणार नाही, सिंचनाची सगळी कामे मार्गी लागतील, अशी आशा वाटते.
- सुरेश हसापुरे, कार्याध्यक्ष, सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटी
---
राज्य सरकारच्या निर्णयाचे मनापासून आभार मानतो. वास्तविक उजनीच्या पाणीवाटपाचे यापूर्वीच नियोजन झाले आहे. त्यामुळे मुळात हा आदेशच चुकीचा निघाला होता, तो अखेर आज रद्द झाला. या निर्णयाबाबत जिल्ह्यातील राष्ट्रवादीच्या नेतेमंडळींनी उपमुख्यमंत्री अजित पवार, जलसंपदामंत्री जयंत पाटील यांची भेट घेऊन भूमिका स्पष्ट केली होती. आता तो आदेश रद्द झाल्यामुळे जिल्ह्यातील तमाम शेतकरी बांधवांना दिलासा मिळाला आहे. त्याचबरोबर सांगोल्याच्या हक्काचे २ टीएमसी पाणी मिळाल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही.
- माजी आ. दीपक साळुंखे - पाटील, राष्ट्रवादीचे प्रदेश उपाध्यक्ष
---
पालकमंत्र्यांचा निर्णय चुकीचाच होता. अगोदरच सोलापूर जिल्हा दुष्काळी असताना उजनीचे पाणी इंदापूरला घेऊन जाण्याचा पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांचा निर्णय चुकीचाच होता. यामुळे दोन जिल्ह्यांत विनाकारण वाद झाला. तो आदेश रद्द झाल्याच्या निर्णयामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आनंद झाला आहे.
- बळीरामकाका साठे, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष
---
उजनीतून ५ टीएमसी पाणी इंदापूरला नेण्याच्या निर्णयाला कडाडून विरोध करून आपल्या भावना मुख्यमंत्र्यांपर्यंत पोहोचविल्या. तसेच जिल्ह्यातील जनप्रक्षोभ पाहता शासनाला दखल घ्यावी लागली आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब यांनी तो आदेश अखेर रद्द केला. मुख्यमंत्र्यांच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. त्याचबरोबर उजनीच्या पाणी वापराविषयी नवीन पुनर्विलोकन करण्यासाठी शासनाने सेवानिवृत्त अधिकारी सुर्वे यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे. या समितीच्या माध्यमातून पूर्वीच्या मंजूर २ टीएमसी पाण्यापेक्षा अधिक पाणी सांगोल्याला कसे मिळेल, यासाठी प्रयत्न करणार आहे
- आ. शहाजीबापू पाटील, सांगोला
---
सोलापूर जिल्ह्यातील ऊस व फळशेतीसह पिण्याचे पाणी जिल्ह्याची वरदायिनी उजनी धरणावर अवलंबून आहे. राष्ट्रवादीने सांडपाण्याच्या नावाखाली ५ टीएमसी पाणी इंदापूरला वळवून जिल्ह्याचे वाळवंट करण्याचा कुटिल डाव आखला होता; परंतु जिल्ह्यातील भाजपचे दोन खासदार व आठ आमदारांसह इतर संघटना व जनप्रक्षोभामुळे राष्ट्रवादीला अखेर आदेश रद्द करून गुडघे टेकावे लागले. पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीच्या निवडणुकीनंतर राष्ट्रवादी शिवसेना काँग्रेसचा हा दुसरा पराभव म्हणावा लागेल.
- श्रीकांत देशमुख, जिल्हाध्यक्ष, भाजप
---
श्रेय जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्याला जाते
उजनी धरणातून इंदापूरला पाच टीएमसी पाणी देण्याबाबतचा निर्णय शासनाने रद्द केल्याचे पत्रक पाहावयास मिळाले. सोलापूर जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांनी पोटतिडकीने उठवलेल्या आवाजामुळेच हा निर्णय रद्द झाला असून याचे श्रेय जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांना जाते. याशिवाय २६ मे रोजी गोविंदबाग येथे शेतकऱ्यांनी आंदोलन केले. यावेळी खा. शरद पवार यांच्याशी चर्चा घडवून सकारात्मक निर्णय घेण्याचे संकेत दिले होते. जिल्ह्यातील सर्वसामान्य शेतकऱ्यांची हाक गोविंदबागेने ऐकली.
- नागेश वनकळसे, यशवंतराव चव्हाण उजनी पाणी बचाव संघर्ष समितीचे अध्यक्ष