उजनी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात शनिवारी दमदार पाऊस पडला असून, एकाच दिवसात ४४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. हा या पावसाळ्यातील एकाच दिवसातील उजनी पाणलोट क्षेत्रात झालेल्या पावसाचा विक्रम आहे. उजनी धरणाच्या वरील बाजूस असलेली १९ धरणे पूर्ण क्षमतेने भरत आल्याने या धरणांतूनही अतिरिक्त विसर्ग भीमा नदीत जोडला जाऊ शकतो व ते पाणी उजनी धरणात येणार असल्याने उजनी धरण लवकरच १०० टक्के भरण्याची शक्यता आहे.
उजनी धरण पाणलोट क्षेत्रात चालू पावसाळ्यात आतापर्यंत एकूण ४९७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. उजनी धरणात सध्या उपयुक्त साठा ४७.४७ टीएमसी एवढा म्हणजे ८९.१३ टक्के एवढा झाला आहे. सध्या उजनीत दौंड येथून ३५२९, तर बंडगार्डन येथून ३२८० क्युसेक विसर्ग सुरु आहे.
..............
उजनीची सद्यस्थिती
एकूण पाणी पातळी ४९६. ३०५ मीटर
एकूण पाणीसाठा १११. ३५ टीएमसी
उपयुक्त साठा ४७.४७ टीएमसी