भीमानगर : सोलापूर जिल्ह्याची वरदायिनी असलेल्या उजनी धरणाने बुधवारी ४३ टक्क्यांचा टप्पा ओलांडला आहे. उजनी धरणामध्ये आता एकूण ८६.९० टीएमसी इतका पाणीसाठा झाला आहे. उपयुक्त पाणीसाठा २२.७३ टीएमसी झाला आहे. गतवर्षी याच दिवशी उजनीची टक्केवारी होती ८.५ टक्के होती. गतवर्षीच्या तुलनेत चालू वर्षी उजनीत समाधानकारक पाणीसाठा झाला असून, गतवर्षीच्या तुलनेत ३५ टक्के पाणी उजनीत अधिकचे आले आहे.
सोमवार व मंगळवारच्या तुलनेत पुणे जिल्ह्यातून पाण्याची आवक कमी झाल्याने टक्केवारीत वाढ संथगतीने होत आहे. मंगळवारी ४० टक्के असलेले धरण बुधवारी तीन टक्क्यांनी वाढ होऊन ते ४३ टक्के झाले आहे. येत्या तीन ते चार दिवसात उजनी ५० टक्के होईल, अशी स्थिती आता निर्माण झाली आहे. खडकवासला धरणातून ३ हजार ६०० क्युसेक विसर्ग सुरू होता, तर बंडगार्डनमधून १० हजार ३५१ क्युसेकनी विसर्ग सुरू होता. भीमा खोऱ्यात बुधवारी मध्यम स्वरूपाच्या पावसाची नोंद झाली आहे.
----
उजनीची सद्यस्थिती
एकूण पाणी पातळी ४९३.८८० मीटर,
एकूण पाणीसाठा २४४६.६० दलघमी,
टीएमसी : ८६.३९
उपयुक्त पाणीसाठा ६४३.७९० दलघमी,
टीएमसी २२.७३, टक्केवारी ४३ टक्के, उजनीत येणारा विसर्ग :
बंडगार्डन १०,३५१ क्युसेक,
दौंड ८,६४५ क्युसेक.
-----