शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदी ब्राझीलला पोहोचले, जोरदार स्वागत; जी-२० शिखर परिषदेत सहभागी होणार! 
2
Maharashtra Vidhan Sabha 2024:  उमेदवार किती कोट्यधीश, किती शिकलेले?
3
'नौटंकी करून मते मिळत नाहीत, मविआकडून दिशाभूल', देवेंद्र फडणवीस यांचे नागपुरात शक्तिप्रदर्शन
4
कोल्हापूरमध्ये जनसुराज्य शक्तीच्या उमेदवारावर जीवघेणा हल्ला, धारदार शस्त्रांनी केले वार 
5
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: धन व प्रतिष्ठेची हानी संभवते, स्त्रीयांशी व्यवहार करताना सावध राहावे!
6
तुम्ही कितीही झेंडे दाखविले तरी मविआच येणार निवडून; प्रियांका गांधी यांचे भाजप कार्यकर्त्यांना प्रत्युत्तर
7
प्रचाराच्या तोफा आज थंडावणार! उमेदवार, मतदारांना आता प्रतीक्षा बुधवारची
8
महागाई नियंत्रणात आणू, मुलांना मोफत शिक्षण देऊ; उद्धवसेनेचे पक्षप्रमुख ठाकरे यांचे आश्वासन
9
Maharashtra Vidhan Sabha 2024: ‘टॉप फाइव्ह’मध्ये मुंबई, ठाणे का नाही?
10
"एमएमआरमध्ये आणले सात लाख कोटींचे प्रकल्प"; देवेंद्र फडणवीस यांचा मुंबई, कोकणातील प्रचारात फोकस
11
डॉलरची दादागिरी; जगाकडे पर्याय दिसत नाही!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोकणात आजी-माजी आमदारांची प्रतिष्ठा पणाला
13
विधानसभा निवडणुकीत पुन्हा महत्त्वाचा मुद्दा; कांद्यामुळे गावाकडे शेतकरी तर शहरात ग्राहक बेजार
14
विशेष लेख : तुमचे मत हेच तुमचे सरकार!
15
मालेगाव जिल्हा निर्मितीचा प्रश्न निकाली काढणार; एकनाथ शिंदे यांचे आश्वासन
16
१५ टक्के ओलावा असलेल्या सोयाबीनची हमीभावाने खरेदी; केंद्रीय कृषी मंत्रालयाचा आदेश
17
Maharashtra Election 2024: प्रचाराचा संडे का फंडा! शेवटच्या रविवारी उमेदवारांचे ‘लक्षवेधी’ नियोजन
18
सणासुदीत वाहन विक्रीने रचला विक्रम; बाइकची विक्री १३.७९ टक्क्यांनी वाढून ३३.११ लाखांवर
19
प्रवेश परीक्षा नियोजनात विद्यापीठ नापास; पेट, एलएलएम परीक्षेत गोंधळ
20
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले

उजनीत आले ३३.२५ टीएमसी पाणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2017 6:10 PM

बेंबळे : पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत उजनी धरणात ३३.२५ टीएमसी पाणी वाढल्याने वजा ३१ टक्के असलेले धरण प्लस २५ टक्के झाले आहे. आतापर्यंत धरणात ५६ टक्के पाणी आले आहे. उजनी धरण सोमवारी सायंकाळपर्यंत प्लस २५ टक्क्या

ठळक मुद्देउजनी काठावरील शेतकºयांची चाललीय धावपळ !उपयुक्त पाणीसाठा हा १३.४0 टीएमसी झाला१२ धरणांचा  पाणीसाठा शंभर टक्के

आॅनलाइन लोकमत सोलापूरबेंबळे : पावसाळा सुरू झाल्यापासून आजपर्यंत उजनी धरणात ३३.२५ टीएमसी पाणी वाढल्याने वजा ३१ टक्के असलेले धरण प्लस २५ टक्के झाले आहे. आतापर्यंत धरणात ५६ टक्के पाणी आले आहे.उजनी धरण सोमवारी सायंकाळपर्यंत प्लस २५ टक्क्याच्या पुढे गेले असून, दौंडमधून येणाºया विसर्गात वरचेवर घट होत आहे. रविवारी रात्री ६५ हजार ४७0 क्युसेक्स असणारा विसर्ग आज २८ हजार ७५९ वर आला आहे. त्यात आनंदाची बाब म्हणजे दोन दिवसांपासून खडकवासला धरणातून बंद केलेला विसर्ग सोमवारी दुपारपासून सात हजार क्युसेक्सने पुन्हा चालू केला आहे. त्यामुळे पुन्हा दौंड येथील विसर्गात वाढ होण्याची शक्यता आहे. उजनी धरणात सध्या ७७ टीएमसी पाण्याचा साठा असून, त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा हा १३.४0 टीएमसी झाला आहे. उजनी धरणाच्या वरील १९ धरणांपैकी खडकवासला ६ हजार ६४८ क्युसेक्स, कासारसाई ४१४, आंद्रा १ हजार १९६, वडिवळे ५६१, भामा ९२४, चासकमान ५ हजार १४५, कलमोडी ६२८ क्युसेक्सचा विसर्ग सुरू असून, १२ धरणांचा  पाणीसाठा शंभर टक्के झाला आहे.-----------उजनीची पाणी पातळी- एकूण पाणी पातळी ४९२.८00 मीटर- एकूण पाणीसाठा २ हजार १८२ दलघमी- उपयुक्त पाणीसाठा प्लस ३७९.६७ दलघमी- टक्केवारी प्लस २५.२ टक्के- विसर्ग-दौंड २८ हजार ७५९ क्युसेक्स, बंडगार्डन २0 हजार ४९८ क्युसेक्स ---------------------उजनी काठावरील शेतकºयांची चाललीय धावपळ !केत्तूर : उजनी जलाशयाच्या पाणीपातळीत वाढ होत असल्याने नदी व धरणाच्या काठावर असलेले साहित्य काढण्यासाठी शेतकºयांची धावपळ सुरू आहे.सध्या उजनी जलाशयाच्या किनाºयावर विद्युत पंप, केबल, पाईप व इतर साहित्य वर घेण्यासाठी शेतकºयांची पळापळ सुरू आहे. पाणी वाढत असल्याने अनेक शेतकºयांचे विद्युत पंप बुडण्याची दाट शक्यता आहे. यामुळे केत्तूर नं. १ येथील तुकाराम जरांडे, अमोल जरांडे, विनोद कोकणे, हनुमंत गावडे यांच्यासह शेतकरी आपले साहित्य धरण व नदी काठावरून हलवत आहेत.