उंबरे-पागे येथील गट नं. ४२ मध्ये ४५ एकर गायरान जमीन आहे. ही जमीन जनावरांच्या चाऱ्यासाठी राखीव आहे. असे असताना प्रहार संघटनेचे पदाधिकारी बापू मोहिते व त्यांच्या कुटुंबीयांनी तीन एकर जमिनीवर अतिक्रमण करून वहिवाटीखाली आहेत. अतिक्रमण केलेल्या जमिनीमध्ये बेकायदेशीर घरे बांधली आहेत. या जमिनीत विविध पिकासह ऊस सारखी पिके घेत आहेत. त्यामुळे येथील सर्वसामान्य नागरिकांच्या जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.
याबाबत येथील नागरिकांनी वेळोवेळी तक्रार दिलेल्या आहेत. परंतु अद्यापही त्या जमिनीतील अतिक्रमण हटवले नाही. संबंधित गट नं ४२ या जमिनीतील अतिक्रमण हटवून कारवाई करण्याची मागणी केली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवकचे जिल्हा उपाध्यक्ष शहाजी मुळे, देविदास कदम, भीमराव देशमुख, नागनाथ कदम, जीवराज मुळे, अमर इंगळे, तानाजी कदम, ब्रम्हदेव कसबे, धनाजी शिवापालक, माणिक कसबे, राजाराम कानगुडे आदी उपस्थित होते.
~~~~~~~~~~~
ग्रामपंचायतीने केला ठराव
येथील ग्रामपंचायतीच्या मालकीचे असलेले गट नं ४२ मधील १६ हेक्टर ४ आर,गट नं ३४५ मधील २ हेक्टर २४ आर आणि गावठाण १६ हेक्टर ६७ आर आदी जमिनीची भूमी अभिलेखच्या माध्यमातून मोजणी करण्याचा ठराव करण्यात आला आहे