लोकमत न्यूज नेटवर्क
चपळगाव : सरपंचपदी उद्योजक उमेश पाटील यांची निवड झाली. ही निवड होताच दुसऱ्या क्षणी त्यांनी गावातील हनुमान मंदिर व वेशीचा जीर्णोद्धार करण्याचा निर्णय घेतला. या बांधकामासाठी त्यांनी वैयक्तिक एक लाख ५१ हजार रुपयांची देणगीदेखील जाहीर केली. सरपंचपदाची सुरुवात दणक्यात केली, तसेच उपसरपंचपदी डाॅ. अपर्णा बाणेगाव यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
अध्यासी सभेचे अधिकारी प्रभाकर कांबळे यांच्या नियंत्रणाखाली सरपंच निवडीची प्रक्रिया पार पडली. सरपंच व उपसरपंचपदासाठी प्रत्येकी एकमेव अर्ज दाखल झाल्याने ही निवडणूक बिनविरोध झाल्याचे प्रभाकर कांबळे यांनी घोषित केले.
यावेळी ग्रा.पं. सदस्या सुवर्णा कोळी, वर्षा भंडारकवठे, रेश्मा तांबोळी, वंदना कांबळे, गौराबाई अचलेरे, धनश्री वाले, चित्रकला कांबळे, मल्लीनाथ सोनार, श्रावण गजधाने, गंगाबाई वाले आदी सदस्य उपस्थित होते. निवड प्रक्रिया यशस्वीपणे पार पाडण्यासाठी ग्रामसेवक एस.बी. कोळी, प्रकाश बुगडे, विजय कोरे, चिदानंद हिरेमठ, तम्मा कांबळे यांनी परिश्रम घेतले.
या निवड प्रक्रियेसाठी सिद्धाराम भंडारकवठे, बसवराज बाणेगाव, महेश पाटील, रियाज पटेल, पांडुरंग चव्हाण, अप्पासाहेब पाटील, अभिजित पाटील, प्रभाकर हंजगे, सुरेश सुरवसे, अंबणप्पा भंगे, डाॅ. काशीनाथ उटगे, प्रभाकर हंजगे, सूरज विजापुरे, चंद्रशेखर शिवगुंडे, गनी पटेल यांनी परिश्रम घेतले. निवडीनंतर नूतन सरपंच, उपसरपंच व सदस्यांचा सत्कार करण्यात आला. सूत्रसंचालन शंभूलिंग अकतनाळ यांनी केले, तर आभार विठ्ठल पाटील यांनी मानले.
-----
उमेश पाटील यांना दुसऱ्यांदा संधी
दरम्यान, चपळगावच्या सरपंचपदी उद्योजक उमेश पाटील यांची दुसऱ्यांदा वर्णी लागली आहे. यापूर्वी सरपंचपद भूषविताना त्यांनी गावाचा सर्वांगीण विकास साधला होता. यामुळेच त्यांची पुन्हा एकदा सरपंचपदी निवड झाली. भूविकास बँकेचे दिवंगत चेअरमन सूर्यकांत बाणेगाव यांची कन्या डाॅ. अपर्णा बाणेगाव यांची उपसरपंचपदी निवड झाली आहे.
---
२७ चपळगाव
चपळगावच्या सरपंचपदी उमेश पाटील आणि उपसरपंचपदी अपर्णा बाणेगाव यांची निवड करण्यात आली.