सोलापूर : अनोळखी इसमाला मुले पळविणाºया टोळीतील समजून बेदम मारहाण करण्याच्या घटना सर्वत्र घडत आहेत. सोलापूर जिल्ह्यातील पाच जणांना धुळे येथे ठार मारण्यात आले. असाच प्रकार सोलापुरात घडला असून पोलिसांच्या समयसूचकतेमुळे एका तरुणाचा बळी जाता जाता वाचला.
दहिटणे परिसरात मागील दोन दिवसांपासून तामिळनाडूचा एक इसम फिरत होता, नागरिकांनी रमेश अंगप्पन (रा. गांधी रोड, मंजकट्टु, मोडाकुर्ची, रा. तामिळनाडू) याला जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात घेऊन आले. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता तो तामिळनाडूचा असल्याचे तपासात निष्पन्न झाले. तो तीन आठवड्यांपासून बेपत्ता होता, सोलापूर पोलिसांनी त्या इसमास तामिळनाडू पोलिसांच्या हवाली केले.
संजय जगताप व महेश शिमगी या दोघांनी रमेशला जोडभावीपेठ पोलीस ठाण्यात घेऊन आले. सोलापूर पोलिसांनी तमीळ भाषा येणाºया ड्रायव्हरला ठाण्यात बोलावले. त्यानंतर त्या ड्रायव्हरने रमेशकडे विचारपूस केली असता, त्याने त्याचे नाव रमेश असे सांगितले. तसेच त्याच्याकडून नातेवाईकांची माहिती घेऊन सोलापूर पोलिसांनी संपर्क केला असता, त्याची मानसिक स्थिती ठीक नसल्याने तो तीन आठवड्यांपासून बेपत्ता असल्याचे सांगितले.
मोडाकुर्ची पोलीस ठाण्यात रमेश मिसिंग असल्याची तक्रार त्याच्या नातेवाईकांनी नोंदविली आहे. पोलिसांनी रमेशवर सोलापूरच्या एका खासगी रुग्णालयात उपचार करून त्याच्या मुलासोबत त्याला आज तामिळनाडूला पाठविले असल्याचे पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी सांगितले. पोलीस आयुक्त महादेव तांबडे, पोलीस उपायुक्त अपर्णा गीते, सहायक पोलीस आयुक्त दीपाली काळे यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पो.नि. यशवंत केडगे, पो. नि. राजेंद्र बहिरट आणि त्यांच्या पथकाने ही कामगिरी केली.
अनुचित प्रकार घडला नाहीमहाराष्ट्रात लहान मुलांना पळवून नेणारी टोळी सक्रिय असल्याबाबत सोलापूर शहरात अफवा पसरली असताना, त्यावरुन वेगवेगळ्या भागात अनुचित घटना घडलेल्या आहेत, दहिटणे परिसरातील सतर्क नागरिकांनी पोलिसांनी केलेल्या जनजागृती मोहिमेच्या प्रभावामुळे त्याला पोलीस ठाण्यात घेऊन आल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नसल्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यशवंत केडगे यांनी सांगितले.