आॅनलाइन लोकमत सोलापूरसोलापूर दि २६ : सुट्टीच्या दिवशी शेतात तुरीची रास करताना मळणीयंत्रात ओढणी अडकली आणि शाळकरी मुलीचा दुदैवी मृत्यू झाला़ ही घटना सोमवार ख्रिसमस सणाच्या दिवश्ी कुमठे (ता़ उ़ सोलापूर) येथील लमाणतांड्यात घडली़आरती आप्पाश राठोड ही कुमठे येथील माध्यामिक प्रशालेत दहावीच्या वर्गात शिक्षक होती़ सोमवारी ख्रिसमस सणाच्या निमित्ताने शाळेला सुट्टी होती़ कुमठे तांड्यानजीक तिची शेती आहे़ आई-वडीलांना तुरीची रास करताना मदत व्हावी या हेतूने तिने दुपारी शेत गाठले़ रास करताना अनावधाने तिची ओढणी मळणीयंत्रात अडकली आणि ओढणीबरोबर तिलाही ओढल्याने डोके व अर्धे शरीर यंत्रात सापडले़ यात गंभीर जखमी झाल्याने तिला उपचारासाठी रूग्णालयात दाखल करण्यात आले होते़ मात्र उपचार सुरू असताना तिचा मृत्यू झाला़ आरती ही वर्गात हुशार विद्यार्थींनी होती़ तिच्या अपघाती निधनामुळे कुमठे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे़
मळणी यंत्रात अडकून शाळकरी मुलीचा दुदैवी मृत्यू, सोलापूरजवळील कुमठे गावातील घटना, ओढणीने तिचा घेतला जीव !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2017 1:16 PM
सुट्टीच्या दिवशी शेतात तुरीची रास करताना मळणीयंत्रात ओढणी अडकली आणि शाळकरी मुलीचा दुदैवी मृत्यू झाला़ ही घटना सोमवार ख्रिसमस सणाच्या दिवश्ी कुमठे (ता़ उ़ सोलापूर) येथील लमाणतांड्यात घडली़
ठळक मुद्देआरती आप्पाश राठोड ही कुमठे येथील माध्यामिक प्रशालेत दहावीच्या वर्गात शिक्षक होती़ कुमठे तांड्यानजीक तिची शेती आहे़ आई-वडीलांना तुरीची रास करताना मदत व्हावी या हेतूने तिने दुपारी शेत गाठले़ तिच्या अपघाती निधनामुळे कुमठे परिसरात हळहळ