या निवेदनामध्ये संवर्ग कर्मचारी यांना २०१९-२० च्या सेवाज्येष्ठतेनुसार पदोन्नती द्यावी, पहिल्या व दुसऱ्या टप्प्यातील स्वछता निरीक्षकपदाची समावेशनासह पदस्थापना करावी, १० मार्च १९९३ पूर्वीच्या रोजंदारी सेवेतील कर्मचाऱ्यांना पूर्ण सेवेत घ्यावे, सातव्या वेतन आयोगाचा फरकातील पहिल्या हप्त्याची रक्कम रोखीने अदा करण्यासाठी नगर परिषदेला निधी द्यावा, या महत्त्वाच्या प्रमुख मागण्यांसह विविध १२ मागण्यांचे निवेदन देण्यात आले.
या मागण्या मार्गी न लागल्यास कर्मचारी शिंदे यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी संघटनेचे अध्यक्ष नितीन शेंडगे, आनंद कांबळे सरचटणीस, जयपाल वाघमारे उपाध्यक्ष, हर्षल पवार संघटनेचे पश्चिम महाराष्ट्राचे सचिव दत्ता गायकवाड, रवींद्र कांबळे कुर्डूवाडी शाखाध्यक्ष सुदर्शन साठे, आरती वाल्मीकी आदींसह संघटनेचे विविध पदाधिकारी उपस्थित होते.
----
राज्यातील नगर परिषद व नगरपंचायत कामगारांच्या विविध मागण्यांसाठी नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे निवेदन देताना संघटनेचे पदाधिकारी.
----