पेट्रोल, डिझेल व गॅसच्या दरवाढीविरोधात साेलापुरात युवक काँग्रेसचे अनोखे आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2021 12:20 PM2021-06-07T12:20:22+5:302021-06-07T12:21:41+5:30
विनापरवाना आंदोलन केल्याप्रकरणी काँग्रेस कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात
सोलापूर - पेट्रोल,डिझेल,गॅस दरवाढी विरोधात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नानाभाऊ पटोले व महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे कार्याध्यक्षा आमदार प्राणिती शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सोलापुरात युवक काँग्रेसच्यावतीने विविध ठिकाणी आंदोलन करण्यात आले. याचवेळी केंद्र सरकारच्या विरोधात निदर्शने करण्यात आली. विनापरवानगी आंदोलन केल्यामुळे कार्यकर्त्यांना पोलिसानी ताब्यात घेतले.
गेल्या 7 वर्षांपासून पेट्रोल, डिझेल व गॅस ची दरवाढ हे केंद्र सरकार सत्यत्याने करत असून याचा फटका सर्व सामान्य नागरिकांना बसत आहे. जवळ जवळ 25 लाख कोटी रुपये केंद्र सरकारने या वाढीमधून गोळा केले आहेत याचा परिणाम महागाई वाढी मध्ये झाला आहे. विशेषतः आंतराष्ट्रीय बाजारपेठेत कच्चे तेलाचे भाव कमी असतानासुद्धा सातत्याने ही भाववाढ नागरिकांना लादली जात असून याचा निषेध आम्ही व्यक्त करतो व ही दरवाढ त्यांनी मागे घ्यावी अशी मागणी यावेळी करण्यात आली.
शहरात युवक काँग्रेसच्यावतीने अंबादास करगुळे, विनोद भोसले, सुमित भोसले यांच्यासह अन्य पदाधिकारी यांनी महागाईविरोधात आंदोलन करून केंद्र सरकारचे लक्ष वेधण्याचे काम केले. यावेळी परिवहन सदस्य तिरुपती पार्किपांडला, रुपेश गायकवाड, कुणाल घोडके, शाहू सलगर, बसवराज कोळी, सुभाष वाघमारे, इम्रान गढवाल, सिद्धू कोरे, बलभीम चव्हाण, जलील शेख,नितीन जमदाडे, रोहित भोसले आदी कार्यकर्ते उपस्थित होते.