श्री संत दामाजी महाविद्यालयातील भूगोल विभागाची विद्यार्थिनी स्नेहल मोहिते ही सोलापूर विद्यापीठाच्या सुवर्णपदकाची मानकरी ठरली आहे. तिने पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठात भूगोल विषयामध्ये पदवी परीक्षेत गुणानुक्रमे प्रथम आल्याने प्राचार्य के. एन. जमादार सुवर्णपदक मिळाले आहे.
आतापर्यंत महाविद्यालयाने इंग्रजी, अर्थशास्र, मराठी विषयात सुवर्णपदकाची परंपरा कायम ठेवली असून, यंदा मिळालेल्या भूगोल विभागाच्या सुवर्णपदकाची त्यात भर पडली आहे. याबद्दल श्री विद्या विकास मंडळाचे समन्वयक राहुल शहा, उपाध्यक्ष बाबासाहेब पाटील, सचिव किसन गवळी, अॅड. रमेश जोशी, संस्था संचालक सदस्य यादवराव आवळेकर, प्राचार्य डॉ. एन. बी. पवार यांनी कौतुक केले. भूगोल विभागप्रमुख डॉ. डी. एस. गायकवाड, डॉ. आर. बी. गावकरे, प्रा. कोटगोंडे, डॉ. आर. एम. पवार, डॉ. मायाप्पा खांडेकर, प्रा. सवाई सर्जे यांचे तिला मार्गदर्शन लाभले.
फोटो
१९मंगळवेढा-सत्कार
ओळी
स्नेहल मोहितेचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. एन. बी. पवार यांच्यासह डॉ. डी. एस. गायकवाड, डॉ. औदुंबर जाधव, अॅड. रमेश जोशी, डॉ. ए. एस. माने, प्रा. आर. एस. गायकवाड, डॉ. आर. बी. गावकरे.