नगरपालिकेवर दिवंगत आमदार स्व. भारत भालके व रतनचंद शहा बँकेचे अध्यक्ष राहुल शहा त्यांचे वर्चस्व आहे. विषय समिती निवडीदरम्यान विरोधी गटालाही सामावून घेत या निवडी करण्यात आल्या. या निवडी संदर्भात विठ्ठलचे अध्यक्ष भगीरथ भालके, ज्येष्ठ नेते रामभाऊ वाकडे, विजयकुमार खवतोडे, मारुती वाकडे यांच्यासमवेत चर्चा करून या निवड बिनविरोधसाठी चर्चा झाली. त्यानुसार आज बैठक घेऊन या निवडी बिनविरोध करण्यात आल्या.
स्थायी समिती सभापती नगराध्यक्ष अरुणा माळी, पाणीपुरवठा समिती सभापती उपनगराध्यक्ष चंद्रकांत घुले, बांधकाम समिती सभापती प्रवीण खवतोडे, आरोग्य समिती सभापती संकेत खटके, नियोजन समिती सभापती अनिल बोदाडे, महिला बालकल्याण सभापती भागीरथी नागणे यांच्या निवडी झाल्या. यावेळी मुख्याधिकारी निशिकांत प्रचंडराव, पांडुरंग नाईकवडी, सब्जपरी मकानदार, सुमन शिंदे, निर्मला माने, रतन पडवळे, सोमनाथ माळी, चंद्रकांत पडवळे, मुजम्मिल काझी, दीपक माने, राहुल टाकणे आदी उपस्थित होते.