शहरं
Join us  
Trending Stories
1
"त्याला आवर घालायचे काम तुमच्याकडून..."; नितेश राणेंच्या भाषेवरून शरद पवार संतापले, भाजपाला सुनावले
2
महिलांसाठी मोठी बातमी: लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता कधी मिळणार?; नवी माहिती समोर
3
डॉक्टर व्हायचेय, पण बजेट २० लाख आहे, मग या देशात होऊ शकता MBBS
4
मुख्यमंत्रिपद जाताच मनोहरलाल खट्टर यांनी केली होती काँग्रेसमध्ये प्रवेशाची तयारी, काँग्रेस नेत्यांचा दावा
5
"...मग तुमचा सत्तेत राहून उपयोग काय?", संभाजीराजे महायुती सरकारवर संतापले
6
Exclusive: अखेर झालं कन्फर्म, बिग बॉस मराठी १०० नव्हे ७० दिवसात संपणार; अधिकृत माहिती समोर
7
भारताच्या तुलनेनं श्रीमंत आहेत युरोपातील सर्वात गरीब देश; किती आहे लोकांचं उत्पन्न?
8
"मी मराठी आणि मुस्लिमांशी व्यवहार करत नाही", मुंबईच्या लोकलमधील 'टीसी'चं संभाषण व्हायरल; वादाला फोडणी!
9
मुलांना नक्की दाखवा...! त्सूचिन्शान एटलास धूमकेतू येतोय पृथ्वीच्या जवळ; या तारखेपासून होणार दर्शन
10
शेजारी अरविंद केजरीवालांची खुर्ची, पदभार स्वीकारताच आतिशी म्हणाल्या, "मी भरताप्रमाणे…’’  
11
IND vs BAN : अन् हिटमॅन रोहितनं फुकला मंत्र; व्हिडिओ व्हायरल
12
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक; हैदराबाद गॅझेटियरबाबत निर्णय होणार?
13
हिजबुल्लाहने युद्धाची घोषणा केली; 'हिसाब-किताब' नाव दिले, म्हणाले- उत्तर कसे द्यायचे ते..."
14
धनगर आरक्षणाचा जीआर निघाला तर ६५ आमदार राजीनामा देणार; महायुतीच्या आमदाराचा इशारा
15
४४ वर्षांनंतर काँग्रेसने जम्मू-काश्मीरच्या तरुणाला दिली जबाबदारी,उदय भानू चिब कोण आहेत?
16
आधी आक्रमक इशारा, नंतर हात जोडले; शरद पवारांच्या पक्षात गेलेल्या नेत्याबद्दल अजित पवार काय म्हणाले?
17
यंदाचा नवरात्रोत्सव १० दिवस: कधी सुरू होणार नवरात्री? पाहा, घटस्थापनेचा मुहूर्त अन् मान्यता
18
...तर अशांवर POCSO गुन्हा दाखल होणार; चाइल्ड पोर्नोग्राफीवर सुप्रीम कोर्टाचा मोठा निर्णय
19
जिथं फिल्डर चुकला; तिथं फलंदाजानंच विणलं आपल्या विकेटचं जाळं! क्रिकेटमधील अजब-गजब रन आउट (VIDEO)
20
Chanakyaniti: गूढ आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हवं? चाणक्यनीतीचे 'हे' पाच नियम अंमलात आणा

गारपिटीचा  १०४ गावांना फटका; ३४७० हेक्टर क्षेत्रावरील पिकांना फटका

By विठ्ठल खेळगी | Published: March 19, 2023 5:51 PM

अवकाळी पावसाने सोलापूर जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०४ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे.

सोलापूर : अवकाळीने जिल्ह्यातील ८ तालुक्यातील १०४ गावांतील पिकांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष, ज्वारी, गहू, केळी, कांदा पपई, कलिंगड, आंबा, पेरू व ज्वारीच्या ३४७० हेक्टरचे नुकसान झाल्याचा अहवाल जिल्हा अधीक्षक कृषी कार्यालयाने तयार केला आहे. 

सोलापूर जिल्ह्यात गुरुवार व शुक्रवारी पडलेल्या पावसामुळे उत्तर तालुक्यातील ११ तसेच माळशिरस व बार्शी तालुक्यातील २.८० असे १३.८० हेक्टरचे नुकसान झाले होते. शनिवारी दुपारपासून जिल्हाच्या विविध वादळ, वारे, गारपीटसह पाऊस पडला. यामुळे माढा, उत्तर सोलापूर व सांगोला तालुके वगळता आठ तालुक्यातील पीकांना झळ पोहोचली. आंबे गळून पडले तर द्राक्षाच्या घडात पाणी शिरल्याने नुकसान पोहोचले. गहू, ज्वारी भिजून गेली व कडबा काळा पडला. पपई, चिक्कू, पेरुचे नुकसान झाले. कांद्याचा रेंदा झाल्याचे शेतकऱ्यांकडून सांगण्यात आले. 

सर्वाधिक झळ अक्कलकोटलाशनिवारी झालेल्या गारपीट, वादळ व पावसामुळे अक्कलकोट तालुक्यातील ३८ गावच्या ८१९ शेतकऱ्यांच्या ३२२ हेक्टर क्षेत्रातील पीकांचे नुकसान झाले आहे. अक्कलकोट पाठोपाठ माळशिरस तालुक्यातील २८ गावच्या ७३० शेतकऱ्यांच्या ६२५ हेक्टरमधील पीकांची हानी झाली आहे. करमाळा तालुक्यातील १२ गावच्या ३०९ शेतकऱ्यांच्या २१६ हेक्टर पीकांचे ३३ टक्क्यांपेक्षा अधिक नुकसान झाले आहे. मोहोळ तालुक्यातील ९ गावच्या ७६ शेतकऱ्यांचे ५८ हेक्टर पीकहानी झाल्याचे सांगण्यात आले. पंढरपूरच्या ६ गावांना गारपीटीचा तडाखा बसला आहे. ६ गावांतील २४०० शेतकऱ्यांच्या १८५० हेक्टरमधील पीकांना नुकसान पोहोचले आहे. बार्शी तालुक्यातील ४ गावच्या २३६ हेक्टरमधील १८० हेक्टर, दक्षिण तालुक्यातील ४ गावांतील १३२ शेतकऱ्यांच्या ८३ हेक्टरचे तर मंगळवेढा तालुक्यातील ३ गावांतील ६७ शेतकऱ्यांच्या १३६ हेक्टर क्षेत्रात नुकसान पोहोचले आहे. अवकाळी पाऊस व गारा पडल्याने रब्बी हंगामातील व इतर पीकांचे नुकसान झाले आहे. प्राथमिक माहितीनुसार गुरुवार, शुक्रवार व शनिवारी पडलेला पाऊस हानीकारक  ठरला आहे. ज्यांनी रब्बी हंगामातील पीकांचा विमा भरला आहे त्यांनी विमा कंपनीकडे पीक नुकसानीबाबत तक्रार ( इंटीमेशन) नोंदवावी. - बाळासाहेब शिंदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी

 

टॅग्स :SolapurसोलापूरRainपाऊसFarmerशेतकरी