बार्शी : तालुक्यात गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसात नागोबाची वाडी परिसरातील दत्ता पिसे यांच्या घरावरील छप्पर उडून संसार उघड्यावर आला आहे. हे कुटुंब मदतीच्या प्रतीक्षेत आहे.
बुधवारी दुपारनंतर झालेल्या अवकाळी पावसाने काही ठिकाणी नुकसान झाले आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत अवकाळी पावसाने पिसे कुटुंबीयांच्या डोक्यावरील छप्पर हिरावून घेतले. कुटुंब उघड्यावर आले आहे. आता हे कुटुंब संगम आशीर्वाद कॉलनीच्या समोरील खुल्या जागेत पत्र्याचे शेड ठोकून होते.
त्यातच अवकाळी पावसाने संकट ओढावल्याने रात्रीच्या झोपेसाठीही वणवण करावी लागली. या कुटुंबाला आता मदतीची गरज आहे. नैसर्गिक संकटात सापडलेल्या पीडिताला मदत देऊन त्यांचा संसार उभा करण्याची हीच ती वेळ आहे.
---
कुटुंब झगडत आहे अनेक संकटांशी
पिसे हे कँसर हॉस्पिटलमधील आरसीआर विभागात शिपाई म्हणून काम करत आहेत. घरात अर्धांगवायू आजाराशी वडील लढताहेत तर मतिमंद असलेला भाऊ हादेखील जगण्यासाठी धडपडतोय. यांना सोबत पिसे हे संसाराचा गाडा हाकत आहेत.