पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन एटीएममधील रोकड चोरीला गेली किंवा नाही याची तपासणी करण्यास बँकेचे शाखाधिकारी यांना सांगितले. दरम्यान चोरट्यांनी एटीएम फोडण्यापूर्वी एटीएम मधील सीसीटीव्ही कॅमेरा काळ्या पिशवीने झाकला. मगच गॅस कटरने जाळून पुढील बाजूने एटीएम फोडण्याचा प्रयत्न केला. एटीएम न फुटल्यामुळे बँकेची लाखो रुपयांची रोकड वाचली. या घटनेत एटीएमचे मात्र मोठे नुकसान झाले. चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद होऊ नये म्हणून काळ्या पिशवी कॅमेरा झाकल्याचे दिसन आले.
यापूर्वीही सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे एटीएम फोडण्याचा अयशस्वी प्रयत्न झाला होता. तेथील सीसीटीव्ही कॅमेऱ्यात चोरटे स्पष्ट दिसून येत होते परंतु अद्याप चोरट्यांचा तपास लागला नाही. आता पुन्हा बँक ऑफ महाराष्ट्राचे एटीएम फोडण्याचा प्रयत्न झाल्याने एटीएमची सुरक्षा व्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. याबाबत, बँकेचे शाखाधिकारी प्रदीप कदम यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे.
-----सुरक्षा रक्षक नेमा--
गावात एटीएम फोडण्याचा प्रयत्न दुसऱ्यांदा झाला आहे. यापूर्वी घडलेल्या प्रकाराचा अद्याप शोध लागलेला नाही. संबंधी बँकेने सुरक्षा रक्षक नेमण्याची गरज असल्याच्या प्रतिक्रिया नागरिकांमधून होत आहेत.
फोटो ओळ- महूद येथील पोलीस चौकीस लागून असलेले बँक ऑफ महाराष्ट्रचे एटीएम गॅस कटरने जाळल्याचे छायाचित्र
----