सोलापूर : विधानसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यातील ११ विधानसभा मतदारसंघात दुपारी तीन वाजेपर्यंत ४३.५१ टक्के मतदान झाल्याची नोंद झाली आहे़ करमाळा, सांगोला, माळशिरशस मतदारसंघात मतदान चुरशीने सुरू आहे तर माढा, मोहोळ, बार्शीत मतदान संथगतीने सुरू आहे. उरलेल्या तीन तासात मतदान जास्तीत जास्त मतदान करून घेण्यासाठी सर्वच पक्षांचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत.
११ विधानसभा मतदारसंघासाठी सोमवारी सकाळी सात वाजता प्रारंभ झाला. सततधार पावसामुळे सकाळच्या सत्रात मतदानाची टक्केवारी कमी प्रमाणात होती़ मात्र अकरा वाजण्याच्या सुमारास पाऊस थांबला अन ् मतदानासाठी मतदारांनी मतदान केंद्रावर मोठी गर्दी केली होती़ दुपारी चारपर्यंत ४३.५१ टक्के मतदान झाले़ उरलेल्या तीन तासात आणखीन मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल असा विश्वास जिल्हा निवडणुक कार्यालयाने व्यक्त केला आहे. दुपारी तीनच्या सुमारास शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील अशोक चौकातील माणेकरी प्रशालेतील मतदान यंत्रात बिघाड झाल्याने महिलांनी थोडा गोंधळ केला होता. मात्र जिल्हा प्रशासनाकडून तातडीने मशीन बदलून मतदान सुरळीत करण्यात आल्याचे सांगितले.
------------------------------------------------------------------------जिल्ह्यातील कोणत्या मतदारसंघात किती टक्के झाले मतदान पहा...
- करमाळा - ४९.०७
- माढा - ४५़०४
- बार्शी - ४७.०२
- मोहोळ - ४५.०५
- सोलापूर शहर उत्तर - ३५.१३
- सोलापूर शहर मध्य - ३५.४९
- अक्कलकोट - ४३.०५
- सोलापूर दक्षिण - ३७.२५
- पंढरपूर - ४२.०३
- सांगोला - ४९.१७
- माळशिरस - ४८.६८