गुुरुवारी (ता. १८) पहाटेच्या सुमारास पुन्हा अवकाळी पाऊल झाला. हा पाऊस कासेगाव, लक्ष्मीटाकळी, खर्डी, कोर्टी, सरकोली परिसरात झाला. अवकाळी पावसामुळे या परिसरातील द्राक्ष बागांना फटका बसला. दोन दिवसांपासून तालुक्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस झाल्याने द्राक्ष उत्पादक शेतकरी हवालदिल झाले आहेत.
लक्ष्मीटाकळी येथील शेतकरी सुरेश टिकोरे यांंची १५ एकर क्षेत्रावरील निर्यातक्षम द्राक्ष काढणीस आली आहे. त्यापूर्वीच अवकाळीचा फटका बसला आहे. पावसाचे पाणी द्राक्ष घडांमध्ये शिरल्याने द्राक्ष मनी चिरण्याची भीती आहे. कासेगाव येथील शेतकरी सुनील भिसे यांची दोन एकर क्षेत्रावरील काढणीस आलेली पपईची बाग वादळी वारे आणि पावसामुळे भूईसपाट झाली आहे. यामध्ये भिसे यांचे सुमारे आठ ते दहा लाख रुपयांचे नुकसान झाले आहे.
सरकोली येथे बुधावरी रात्री नारळाच्या झाडावर वीज कोसळली. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवीत अथवा वित्तहानी झाली नाही.
फळबागांबरोबरच रब्बी ज्वारी, गहू, हरभरा या पिकांचेही अवकाळीमुळे नुकसान झाले आहे.
कोट :::::::::::::
दोन दिवस झालेल्या अवकाळी पावसामुळे द्राक्ष बागांचे नुकसान झाले आहे. द्राक्ष घडांमध्ये पावसाचे पाणी शिरल्याने मन्यांना तडे जाण्याची शक्यता आहे. गेल्यावर्षीप्रमाणे यावर्षीही शेतकऱ्यांना अवकाळीच्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे.
- सुरेश टिकोरे
द्राक्ष उत्पादक शेतकरी, लक्ष्मीटाकळी
फोटो ओळी :
कासेगाव (ता. पंढरपूर) येथे गुरुवारी झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकरी सुनील भिसे यांची भुईसपाट झालेली पपईची बाग.