२९ डिसेंबर रोजी सह्याद्री अतिथीगृहात जलसंपदा विभागाची बैठक जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झाली. या बैठकीत विठ्ठल कारखान्याचे चेअरमन भगिरथ भालके यांनी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेच्या कामासाठी महाविकास आघाडीने १० कोटींच्या निधीची तरतूद करण्यात आली होती. त्यापैकी टोकन निधी या योजनेसाठी मिळावा, त्यासाठी या योजनेचे लेखाशीर्ष निर्माण करावे, उजनीची अपूर्ण कामे पूर्ण करण्यासाठी ६५ कोटींची अर्थसंकल्पात तरतूद केली होती, तोही निधी मिळावा, पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघातील उर्वरित प्रलंबित कामे तातडीने पूर्ण करावी, अशी मागणी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांच्याकडे केली होती.
त्यावेळी जयंत पाटील यांनी संबंधित अधिकाऱ्यांना मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचे लेखाशीर्ष उघडावे, उजनीच्या अपूर्ण कामांचे अंदाजपत्रक सादर करावे, निधी उपलब्ध करून देऊ, असे सांगत आ. भारत भालके यांच्या पाठपुराव्यामुळे मंजूर झालेल्या ३५ गावच्या उपसा सिंचन योजनेस निधी कमी पडू देणार नाही व योजना मार्गी लावू, असे सांगितले.
यावेळी जलसंपदा विभागातील सचिव व मंत्रालयीन उच्यस्तरीय अधिकारी, कृष्णा खोरे विकास महामंडळ पुणे येथील अधिकारी उपस्थित होते.