बार्शी : संपूर्ण देश कोरोनाच्या विखळ्यात सापडला आहे. कोरोनाविरुद्ध लढा देण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. अशातच भारताच्या डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन निर्मित ‘२ डीजी’ औषधाला कोरोना रुग्णांवर उपचारासाठी केंद्र सरकारने मंजुरी दिली.
डॉ. संजय अंधारे यांनी त्यांच्या सुश्रुत हॉस्पिटल येथे या औषधाचा वापर करून १५ गंभीर व अतिगंभीर कोरोनाग्रस्त रुग्णांवर यशस्वीपणे उपचार केले आहेत.
ज्या रुग्णाच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी धोक्याच्या खाली गेली आहे अशांवर या औषधाचा उपयोग करून पाहिला. त्यात १० रुग्णांना उत्तम प्रतिसाद मिळाला. आणखी तीन रुग्णांच्या तब्येतीत चांगलीच सुधारणा होत असल्याचे डॉ. अंधारे यांनी सांगितले.
व्हायरस हापण एक जीव आहे. त्याला भूक लागणार तेंव्हा तो भूक शमविण्यासाठी अन्न म्हणून ते खायला येईल आणि ‘२ डीजी’च्या जाळ्यात अडकून बसेल.
व्हायरस शरीरामध्ये वेगाने वाढताच रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासते. मात्र हे औषध व्हायरसला वाढण्यापासून रोखत असल्याने रुग्णांना ऑक्सिजनची गरज भासणार नाही. ‘२ डीजी’ घेतल्यास कोरोना रुग्ण सामान्य उपचाराच्या तुलनेत तीन दिवस आधी बरा होतो. त्याची ऑक्सिजन निर्भरतादेखील ४० टक्क्यांनी कमी होत असल्याचा दावा डीआरडीओने केला असल्याचे डॉ. संजय अंधारे यांनी सांगितले. (वा. प्र.)