भीमा नदीत पाणी सोडण्याची मागणी
मंगळवेढा : तालुक्यातील दामाजी कारखाना परिसरात मोठ्या प्रमाणात ऊसाची शेती आहे. नुकताच कारखान्याला ऊस गाळपासाठी गेलेला आहे. त्या ऊसाची मशागत केली आहे, मात्र सध्या नदीत पाणी नसल्याने शेतीला पाणी देणे कठीण होत आहे. त्यामुळे उजनीतून भीमा नदीद्वारे पाणी सोडण्याची मागणी नदीकाठच्या गावांमधून होत आहे.
लॉकडाऊनच्या भीतीने पालेभाज्यांचे दर गडगडले
दक्षिण सोलापूर : उन्हाची तीव्रता वाढत असल्याने शेतकरी सध्या मोठ्या प्रमाणात पालेभाज्या व फळभाज्या विक्रीसाठी बाजारात आणत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या भीतीने व्यापारी दर कमी करून मागत आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होत आहे. गत महिन्यापेक्षा ५० ते १०० रुपयाने दर कमी झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
यात्रेवर अवलंबून असणारे छोटे व्यावसायिक अडचणीत
मोहोळ : मार्च महिना उजाडताच अनेक गावांच्या यात्रांना प्रारंभ होतो. यावर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक गावच्या ग्रामदैवतांच्या यात्रा रद्द झाल्या आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात थंड लस्सी, बर्फ, मठ्ठा, आईस्क्रीम यासह खेळणी, ऊसाचे रसपानगृह असे छोटे व्यवसाय अडचणीत आले आहेत. त्यामुळे आम्हाला गावोगावी फिरून व्यवसाय करावा लागत असल्याचे अनेक व्यावसायिकांनी सांगितले.