याबाबत नागरिक काळजी घेण्याऐवजी सार्वजनिक ठिकाणी अनावश्यक गर्दी करीत आहेत. यामुळे कोरोनाचे प्रस्थ वाढताना दिसत आहे. तीन महिन्यांपासून अक्कलकोट शहर व तालुक्यात कोरोनाचे रुग्ण आटोक्यात आले होते. महिनाभरापासून पुन्हा लग्नकार्ये, धार्मिक कार्यक्रम, वाढदिवस, वास्तुशांती, यात्रा, जत्रा अशा विविध ठिकाणी लोक गर्दी करीत आहेत. यामुळे कोरोना पुन्हा एकदा वाढत आहे.
अक्कलकोट तालुक्यात अक्कलकोट शहरात ग्रामीण रुग्णालय, चप्पळगाव, शिरवळ, वागदरी, मैंदर्गी, जेऊर, करजगी अशा सहा ठिकाणी कोरोनाची लस देण्यासाठी सोय केली आहे. आतापर्यंत पहिला डोस घेणाऱ्यांचा आकडा ३ हजार २१९ तर दुसरा डोस १ हजार ३२ जणांनी घेतला आहे. या केंद्रावर ४५ ते ५९ वयोगटातील ज्येष्ठ नागरिक बीपी, शुगर, कॅन्सर यासारख्या रुग्णांना प्राधान्य देण्यात येत आहे.
-----
लोकांची गर्दी.. पोलिसांचे दुर्लक्ष---
मागील दोन दिवसांत अक्कलकोट शहरात बागवान गल्ली, आझाद गल्ली, सेंट्रल चौक, नवीन तहसील परिसर, याबरोबरच ग्रामीण भागात चप्पळगाव, तडवळ, समर्थनगर, नागणसूर, जेऊरवाडी, सिंदखेड या गावांत, गल्लीत मिळून नव्याने २० कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. अक्कलकोट येथे लग्नकार्य, वास्तुशांती, यात्रा, जत्रा यासारख्या सार्वजनिक कार्यक्रमांमुळे लोक गर्दी करत आहेत. याकडे पोलिसांचे दुर्लक्ष होत आहे. वेळीच अशा गोष्टींना पायबंद घालावा, अशी मागणी होऊ लागली आहे.
----
१३अक्कलकोट-कोरोना
फोटोओळ : एकीकडे कोरोनामुळे गर्दी करू नका, असे सांगितले जात असताना अक्कलकोट शहरात लोकांचा असा बिनधास्त वावर सुरु आहे.