डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ तालुका मराठा सेवा संघाच्या वतीने एकरी १०० टन उत्पादन संकल्प कार्यक्रम अंतर्गत ऊस पीक परिसंवाद आयोजित केला होता. अध्यक्षस्थानी बागायतदार काशिनाथ राऊत होते. व्यासपीठावर प्रा. दिनेश क्षीरसागर, डॉ. सुरज मिसाळ, उपनगराध्यक्ष प्रमोद बापू डोके, ज्येष्ठ विधिज्ञ क्षीरसागर बापू, अरुण भोसले आदींची उपस्थिती होती.
प्रारंभी जिजाऊ, बळीराजा आणि डॉ पंजाबराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजनानंतर दिल्लीतील मृत शेतकऱ्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. यासह कॅलेंडर २०२१ तसेच बळीराजा अंकाचे अनावरण करण्यात आले.
कार्यक्रमासाठी तालुकाध्यक्ष मनोजकुमार मोरे, आकाश फाटे, रणधीर देशमुख, धनराज फाटे, सज्जन सातपुते,विशाल देशमुख, सुरज धनवे, करण तगारे आदी पदाधिकऱ्यांनी परिश्रम घेतले.
---०१मोहोळ----
मोहोळ येथे आयोजित ऊस परिसंवादात बोलताना डॉ. शरद जाधव. सोबत काशिनाथ राऊत,प्रा. दिनेश क्षीरसागर, डॉ. सुरज मिसाळ, उपनगराध्यक्ष प्रमोद बापू डोके, ज्येष्ठ विधिज्ञ क्षीरसागर बापू, अरुण भोसले आदी.मोहोळ येथे आयोजित ऊस परिसंवादात बोलताना डॉ. शरद जाधव. सोबत काशिनाथ राऊत,प्रा. दिनेश क्षीरसागर, डॉ. सुरज मिसाळ, उपनगराध्यक्ष प्रमोद बापू डोके, ज्येष्ठ विधिज्ञ क्षीरसागर बापू, अरुण भोसले आदी.