शहरं
Join us  
Trending Stories
1
सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; एकनाथ शिंदे उद्या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणार
2
IPL Auction 2025: काव्या मारनची 'स्मार्ट' खेळी! जयदेव उनाडकटने रचला मोठा इतिहास; केला अनोखा विक्रम
3
विरोधी पक्षनेतेपदासाठी ठाकरे गट आग्रही, पण मविआ एकत्रित दावा करू शकते का? कायदा काय सांगतो?
4
IPL Auction 2025: १३ वर्षांचा वैभव सूर्यवंशी झाला 'करोडपती'! राजस्थानने केलं 'रॉयल' स्वागत; किती लागली बोली?
5
भाजपचे नियोजन 'King', मायक्रो प्लानिंगच्या जोरावर पक्षाला मिळवून दिला सर्वात मोठा विजय
6
IPL Auction 2025: Rohit Sharma ला 'ओपनिंग पार्टनर' मिळाला! Mumbai Indians ने ५.२५ कोटींना 'याला' संघात घेतला!
7
अमेरिकेतील 'या' शहरातून सूर्य गायब; आता थेट दोन महिन्यांनी होणार दर्शन, कारण...
8
अविमुक्‍तेश्‍वरानंद यांनी उद्धव ठाकरेंना दिला होता CM होण्याचा आशीर्वाद, आता सांगितलं माहायुतीच्या महाविजयाचं कारण 
9
कोण आहे Priyansh Arya? ज्याच्यासाठी प्रिती झिंटानं ३० लाख ऐवजी पर्समधून काढले ३.८० कोटी
10
निकालापूर्वी राजकीय संन्यास जाहीर केला, भाजपाला मोठे यश मिळताच निर्णय बदलला; नेते म्हणाले...
11
ऑफिसात डुलकी घेतली, म्हणून कंपनीनं नोकरीवरून काढलं; 'त्यांनी' असा बदला घेतला की, सर्वांनाच चकित केलं!
12
“मविआत आमचे संख्याबळ जास्त, मला विरोधी पक्षनेता व्हायला नक्कीच आवडेल”: भास्कर जाधव
13
IPL Auction 2025 : एका डावात १० विकेट्स घेणाऱ्या MI च्या गोलंदाजाला CSK नं केलं 'करोडपती'  
14
मतमोजणीच्या आकडेवारीत घोळ? व्हायरल पोस्टचे सत्य समोर, निवडणूक अधिकारी म्हणाले...
15
पुन्हा तेच घडले? पिपाणी चिन्हामुळे घोळ, तुतारीला बसला मोठा फटका; शरद पवारांचे ९ उमेदवार पडले
16
“आमचे आमदार फुटणार नाहीत, ताकदीने लढणार”; ठाकरे गटाला ठाम विश्वास, शिंदे गटाला सुनावले
17
IPL Auction 2025: MS Dhoni चा 'भिडू' Mumbai Indians ने पळवला; दीपक चहरसाठी मोजले किती कोटी? जाणून घ्या
18
मी ही निवडणूक मोठ्या मताधिक्याने कसा जिंकलो..? जितेंद्र आव्हाडांनी सांगितला १ ऑगस्टपासूनचा EVM चा घटनाक्रम
19
IPL Auction 2025: भुवीसाठी MI अन् LSG यांच्यात 'बोली युद्ध'; होऊ दे खर्च म्हणत शेवटी RCB नं मारली बाजी
20
फडणवीस मुख्यमंत्री झाले तर भाजपकडे शिंदेंसाठी प्लॅन 'B'? ठरू शकतो असा फॉर्म्युला 

‘सांडपाणी’ असा गोंडस शब्दप्रयोग करून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 27, 2021 4:22 AM

करमाळा : उजनी जलाशयाच्या उर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे ‘सांडपाणी’ असा गोंडस शब्दप्रयोग करून जलसंपदा खात्याने ...

करमाळा : उजनी जलाशयाच्या उर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे ‘सांडपाणी’ असा गोंडस शब्दप्रयोग करून जलसंपदा खात्याने राज्य शासनाची दिशाभूल केली आहे. यावर उजनी धरणग्रस्त संघर्ष समिती आक्रमक झाली आहे. उजनीवर अवलंबून असणाऱ्या मूळ उजनी धरणग्रस्तांसाठी अतिशय अन्यायकारक आहे. त्यामुळे ही योजना तत्काळ मागे घ्यावी, अशी मागणी समितीच्या वतीने करण्यात आली आहे.

या मागणीचे निवेदन धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदार समीर माने यांना देण्यात आले आहे.

यावेळी धरणग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष तथा बाजार समितीचे सभापती प्रा. शिवाजी बंडगर, जिल्हा परिषद सदस्या सविताराजे भोसले, करमाळा पंचायत समितीचे सभापती गहिनीनाथ ननवरे, माजी सभापती शेखर गाडे, बाजार समितीचे संचालक आनंदकुमार ढेरे, बहुजन संघर्ष सेनेचे राजाभाऊ कदम, संदीप यादव, सुनील भोसले, बाळासाहेब टकले, युवासेनेचे शंभूराजे फरतडे, सरपंच दादा कोकरे, संभाजी रिटे, गणेश घोरपडे, गंगाधर वाघमोडे उपस्थित होते.

निवेदनात म्हटले आह की, जलसंपदा विभागाने २२ एप्रिल रोजी एक आदेश काढून कृष्णा खोरे विकास महामंडळास उजनी धरणातून पाच टीएमसी पाणी उचलून मुळा मुठा उजव्या कालव्यात सोडून खडकवासला प्रकल्पाचे सिंचन स्थिरीकरण करण्यासाठी आवश्‍यक त्या बाबींच्या पूर्तता करण्याच्या सूचना लेखी पत्रान्वये दिलेल्या आहेत. या प्रस्तावित योजनेचा पूर्वसंभाव्यता अहवाल व्यवहार्य असल्याची खातरजमा करणे, योजनेचा सविस्तर सर्व्हे करून प्रशासकीय व तांत्रिक मान्यता देणे, तसेच योजनेसाठी पाणी उपलब्धता प्रमाणपत्र देणे आदी सूचना दिलेल्या आहेत.

वस्तुत: उजनी जलाशयाच्या उर्ध्व बाजूस बिगर सिंचन पाणी वापरातून उपलब्ध होणारे ‘सांडपाणी’ असा गोंडस शब्दप्रयोग करून जलसंपदा खात्याने राज्य शासनाची दिशाभूल केली आहे. उजनी जलाशयातील पाणीवाटप खरं तर यापूर्वीच पूर्ण झालेलं आहे. मूळ सिंचन आराखडाप्रमाणे आता यापुढे पाणी कोणत्याही उपसा सिंचन योजनेस देता येत नाही.

सांडपाण्यावरचा हक्क कोणी ठरविला

सांडपाण्याच्या नावाखाली खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण करताना, सांडपाण्यावर फक्त या योजनेचाच हक्क आहे का, हे कुणी ठरवले, उलट सांडपाणी शुद्ध करून ते उजनीत सोडून उजनीवर असलेला ताण कमी करणं गरजेचं आहे. सांडपाण्याच्या गोंडस नावाखाली खडकवासला प्रकल्पाचे स्थिरीकरण करण्याचा घातलेला घाट, उचललं जाणारं पाणी ही उजनी जलाशयाची हत्याच ठरेल.

दरवर्षी उन्हाळ्यात उजनी धरण मृत साठ्यात जाते. मृत साठ्यात वजा पन्नास टक्के इतके पाणी अनेकदा खाली जाते. या काळात सर्व पाणीपुरवठा योजना बंद पडल्याची वस्तुस्थिती आहे. उजनीच्या लाभक्षेत्रातील सर्व शेती ओसाड पडलेली असते. सहा- सहा महिने लाभक्षेत्रात पाणी सोडता येत नाही. अशी स्थिती अनेकदा निर्माण झालेली असते. त्यात पुन्हा पाच टीएमसी पाणी उचलणे म्हणजे धरणग्रस्तांवर फार मोठा अन्याय आहे. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही असे निवेदनात म्हटले आहे.

फोटो ओळी : उजनी धरणग्रस्त संघर्ष समितीच्या वतीने तहसीलदारांना निवेदन देताना पदाधिकारी.