शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तेव्हा तुम्हाला हॉस्पिटलला जायची गरज लागणार नाही"; पंतप्रधान मोदींचा उद्धव ठाकरेंना टोला
2
"देवेंद्र फडणवीस हे भारतीय राजकारणाचे भविष्य"; केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांचे विधान
3
"सरकार बनवण्यासाठी काँग्रेस तडफडतंय"; पंतप्रधान मोदींची मुंबईतून पुन्हा 'एक है तो सेफ है'ची घोषणा
4
"बटेंगे तो कटेंगे भाषा महाराष्ट्रात नाही चालणार"; सुप्रिया सुळेंचे भाजपवर टीकास्त्र
5
"तुम्ही तर कधी तिरंगाही कधी लावत नव्हता"; मल्लिकार्जुन खरगेंचा भाजपवर निशाणा
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'कारखाने विकत घ्यायला मी काही महाराष्ट्रभर हिंडलो नाही'; जयंत पाटलांनी अजित पवारांना डिवचले
7
DRDO ला आणखी एक मोठं यश, गाइडेड पिनाका वेपन सिस्टीमची यशस्वी चाचणी
8
"जेव्हा पराभव समोर दिसतो, तेव्हा 'असे' नॅरेटिव्ह सेट करण्याचा प्रयत्न सुरू होतो"; प्रविण दरेकर यांचा सुप्रिया सुळेंना टोला
9
"बंद सम्राटांना कायमचं घरात बंद करायची वेळ आलीय"; CM शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर अप्रत्यक्ष निशाणा
10
'पाकिस्तानचे अनेक देशांशी संबंध, पण...', भारत-रशिया मैत्रीवर जयशंकर यांची मोठी प्रतिक्रिया
11
अचानक मोठा विकेंड जाहीर! १५ ते २० नोव्हेंबर 'या' शाळा बंद राहणार; शासनाचा मोठा निर्णय
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'काल माझं अन् शरद पवारांचं भांडण झालं, त्यांनी सात सभा..."; सुप्रिया सुळेंनी सगळंच सांगितलं
13
गुंतवणूकदार विचित्र परिस्थितीत अडकले! शेअर ६१ हजारांनी पडला पण विकताही येत नाहीय...
14
दिल्ली महापौरपदासाठी भाजपचा उमेदवार अवघ्या ३ मतांनी हरला; आपची महापालिकेवर सत्ता
15
“मोदींनी ११ वर्षात काय केले? महाराष्ट्राच्या निवडणुकीचा ३७० कलमाशी काय संबंध?”: खरगे
16
काव्या मारनने संघाबाहेर काढलं, त्यानेच टीम इंडियाला रडवलं! आता लागणार १० कोटींची बोली?
17
बाळासाहेबांची इच्छा आम्ही पूर्ण केली, छ. संभाजीनगरच्या नामकरणावरुन PM मोदींचा उद्धवसेनेवर 'बाण'
18
घुसखोरांनाही ४५० रुपयांत गॅस सिलेंडर देणार; काँग्रेस नेत्याच्या विधानानं नवा वाद
19
गाझामध्ये इस्रायलचं तांडव, संपूर्ण कुटुंब नष्ट; शेजारी म्हणाला, "केवळ एकच मुलगा वाचला, पण तोही...!"
20
"गद्दारी केली तर लाज वाटण्यासारखं काहीच नाही"; दिलीप वळसेंच्या लेकीचे शरद पवारांना प्रत्युत्तर

उजनीने कमालीची पातळी गाठल्यामुळे ऐतिहासिक वास्तूंचे दर्शन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2019 11:52 AM

दुष्काळाची दाहकता; पळसनाथ मंदिर पाण्याबाहेर : १० व्या शतकातील मंदिर पाण्यात राहूनही शाबूत

ठळक मुद्देदुष्काळामुळे उजनी पात्रातील पळसनाथ मंदिर पूर्णपणे पाण्यातून बाहेर आलेपुणे जिल्ह्यातील पळसनाथ मंदिर व सोलापूर जिल्ह्यातील ईनामदार वाडा ही उजनी धरणातील पर्यटन केंद्रेचमंदिराच्या संपूर्ण बाजूला दगडाची तटबंदी आहे. परंतु त्याची पडझड झालेली आहे.

प्रदीप पाटीलभीमानगर : दुष्काळामुळे उजनी पात्रातील पळसनाथ मंदिर पूर्णपणे पाण्यातून बाहेर आले आहे. इंदापूर तालुक्यातील पळसदेव गावातून आत उजनीच्या पात्राकडे ३ किमीच्या आसपास गेले की पुणे-सोलापूर हायवेवरून हे मंदिर दिसते. टेंभुर्णीपासून सुमारे ३५ किमी अंतरावर हे मंदिर आहे तर सोलापूरपासून १२५ किमी अंतर आहे.

मंदिरात जायचे झाल्यास छोट्याशा होडीनेच जावे लागते. होडीत बसल्यानंतर आपण जसजसे मंदिराच्या जवळ जातो तसतसे ते मंदिर आपल्याला अजूनच आकर्षित करत राहते. त्याची भव्यता आपल्याला दिसायला लागते. हे मंदिर हेमाडपंथी असून सुमारे १० व्या शतकातील आहे.

संपूर्ण मंदिर मोठमोठे दगड, शिळा, पक्क्या विटा, चुना आणि त्यावर नक्षीकाम करून हे मंदिर बनवले आहे. यामुळे हे मंदिर बघताना तुम्हाला खूप साºया इतिहासातील गोष्टी पाहायला मिळतील. भीमा नदीचे पाणी या मंदिराला येऊन धडकत असते. त्यानंतर उजनी जसजसे भरत जाईल तसे हे मंदिर पाण्याखाली जाते.

मंदिरात चौकोनी खांब, वर्तुळाकार पात्रे, त्यातच पुष्प, नट, स्तंभ, लवा, बेल अशा पंचशाखा सुस्थितीत दिसून येतात. शिल्प मूर्तींमध्ये प्रामुख्याने दशावतार, शंकर-पार्वती, तीन वीरगळी, रामायण-महाभारतकालीन कलाकृती, इंद्राच्या दरबारात असणाºया देवीदेवतांची शिल्पे, त्या काळातील अप्रतिम कोरीव काम, जडणघडण आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळेल. गाभाºयासमोर नंदी आहे. गेली अनेक वर्षे हे मंदिर पाण्याखाली असून देखील चांगल्या स्थितीत आहे. हा प्राचीन वास्तू कलेचा हा उत्तम नमुना आहे. मंदिराच्या संपूर्ण बाजूला दगडाची तटबंदी आहे. परंतु त्याची पडझड झालेली आहे.

पाण्याबाहेरच्या वास्तूंमुळे पर्यटकांमध्ये वाढ- पुणे जिल्ह्यातील पळसनाथ मंदिर व सोलापूर जिल्ह्यातील ईनामदार वाडा ही उजनी धरणातील पर्यटन केंद्रेच झाली असून मोठा दुष्काळ पडला की धरण पातळी खोलवर जाते व या ऐतिहासिक वास्तू पाहायला मिळतात. त्यामुळे प्रत्येकवर्षी हजारो पर्यटक या ठिकाणांना भेटी देतात.

टॅग्स :SolapurसोलापूरUjine Damउजनी धरणWaterपाणीdroughtदुष्काळ