महाराष्ट्र केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या आदेशानुसार हा इशारा बार्शी असो.चे अध्यक्ष सुधीर राऊत, अभिजित गाढवे, मोईज काझी, गणेश बारसकर, हेमंत गांधी यांनी हे निवेदन दिले.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या महामारीत अग्रक्रमाने काम करणाऱ्यांच्या यादीत कोविडयोद्धा म्हणून या औषध विक्रेत्यांच्या सेवेकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले आहे. औषधाची विक्री करताना प्रत्यक्ष संबंध कोविड रुग्ण अथवा त्यांच्या संपर्कात असलेल्या नातेवाइकांशी जवळून येतो. सध्या महाराष्ट्रासह देशात २०० पेक्षा अधिक औषध विक्रेते कोरोनाचे बळी पडले, तर एक हजारच्या जवळपास परिवारातील त्यांचे नातेवाईक बाधित झालेले आहेत. शासनाने दखल घेतली नाही तर संघटनेला संपूर्ण लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊन व्यवसाय बंद करण्याशिवाय पर्याय राहणार नाही, असा इशारा अखिल भारतीय व महाराष्ट्र राज्य संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी दिल्याने बार्शी केमिस्ट ॲण्ड ड्रगिस्ट असोसिएशनच्या वतीने बंदचे निवेदन दिले आहे.
----