लस घेण्यासाठी सोमवारी मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळाली. अनेक नागरिकांनी ऑनलाइन रजिस्ट्रेशन केले, ओटीपी आहे. मोबाइल नंबर, आधार नंबर व्यवस्थित नोंदणी न झाल्याने याचा फटका बसला. खात्री करण्याच्या कारणामुळे लसीकरणासाठी विलंब होत असल्याचे पाहायला मिळाले. शासनाच्या या दप्तर दिरंगाईचा नाहक त्रास लसीकरणासाठी आलेल्या नागरिकांना झाला. मनुष्यबळ कमी असलेल्या आरोग्य यंत्रणेवर ताण पडल्याचे चित्र पाहायला मिळाले.
नागरिकांनी आधारकार्डप्रमाणे आधार नंबर व मोबाइल नंबर व्यवस्थित नोंदणी करून गर्दी न करता लसीकरणासाठी यावे. व्यवस्थित नोंदणी करून लसीची मागणी केली असून, उपलब्धतेनुसार लस घेऊन शासनाच्या नियमांचे पालन करावे, असे आमदार बबनराव शिंदे यांनी सांगितले.
कोट ::::::::::::
लस उपलब्ध होईल त्याप्रमाणे लस देण्यात येत आहे. ऑनलाइन पद्धतीने व्यवस्थित नोंदणी न झाल्याने गर्दी होत असून, व्यवस्थित नोंदणी करून लसीकरणाची यावे.
- डाॅ. सदानंद व्हनकळस,
वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय