वडवळ : मोहोळ तालुक्यात वडवळ येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण शिबिर घेण्यात आले. यामध्ये ५० नागरिकांना कोरोना प्रतिबंधक लसीचा पहिला डोस देण्यात आला. लस घेण्याच्या अगोदर कोरोना टेस्ट केली जात असल्यामुळे नागरिकांमध्ये काही काळ विनाकारण भीती व चिंता वाटत होती.
मात्र शिरापूर प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी
डॉ. वाय. जे. जगताप यांनी ग्रामस्थांना मार्गदर्शन केले. त्यानंतर ग्रामस्थांनी प्रतिसाद देत चाचणी व लसीकरण करून घेतले. या शिबिरात ५० जणांची टेस्ट देखील निगेटिव्ह आली. भक्तनिवास येथील मंगल कार्यालयात कोविड लसीचा पहिला डोस देण्यात आला. यावेळी डॉ.थोरात, भडंगे, मगर, माढेकर, पाटील, अरब,शेकप्पा पवार, अंगणवाडी सेविका, मदतनीस, आशा वर्कर , ग्रामपंचायत कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
यावेळी सरपंच जालिंदर बनसोडे, उपसरपंच धनाजी चव्हाण, देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष श्रीकांत शिवपूजे ग्रामपंचायत सदस्य राहुल मोरे, शहाजी देशमुख, ग्रामसेवक तात्या नाईकनवरे, तलाठी समाधान कांबळे, पुनराज शिखरे, छोटु पवार, नागेश संकपाळ , नागनाथ शिवपुजे उपस्थित होते.