कुसळंब : गटविकास अधिकारी व आरोग्य विभाग यांच्या पुढाकारातून सरपंच गंगूबाई जगताप, उपसरपंच विष्णू आवटे, बाळासाहेब जगताप, बाळासाहेब जाधव यांच्या प्रयत्नातून जामगाव येथे कोरोना विरोधात जनजागृती करून गाव शंभर टक्के लसीकरण पूर्ण केले.
तालुका वैद्यकीय अधिकारी अशोक ढगे व आरोग्य विभागाच्या पथकाने प्रभावीपणे मोहीम राबविली. यावेळी लसीकरणाचे फायदे सांगितले. आमदार राजेंद्र राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली लसीकरण माेहीम राबविण्यात आली. आरोग्य कर्मचारी एस. बी. लंगडे, के. एन. गायकवाड, एम. एम. जाधवर, आरोग्यसेविका बी. एम. रंगरेन, कमल खंडागळे, शीला खुरुंगळे, राणी मुकटे, सीता बिवलकर, ऊर्मिला नन्नवरे, ग्रामसेवक रंजित माळवे, नितीन आवटे, अमर ठोंबरे, गुणवंत खुरुंगळे, प्रकाश आडसूळ, आकाश जगताप, विनोद मस्के, कृष्णा मुकटे, योगेश धायगुडे, आदित्य जगताप, राज जगताप, बिभीषण मुकटे, ओम काळे, पांडुरंग यादव, राजेंद्र अडसूळ यांनी परिश्रम घेतले.
----
फोटो : २० जामगाव
जामगाव येथे आरोग्य पथकाने लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविली.