शहरं
Join us  
Trending Stories
1
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
2
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
3
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
4
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
5
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
6
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
7
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
8
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
9
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
10
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
11
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
12
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
13
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
14
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
15
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
16
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
17
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ
18
माझा पुढचा जन्म 'या' राज्यातच व्हावा, अशी माझी इच्छा आहे; धीरेंद्र शास्त्री यांचं विधान
19
"लेबनानमधील पेजर हल्ला हा इस्रायलचा 'मास्टरस्ट्रोक', भारतात जर असा प्रयत्न झाला तर..."
20
हरियाणा निवडणुकीत काँग्रेस उमेदवाराला धक्का; कोर्टाचा आदेश, "आत्मसमर्पण करा, अन्यथा..." 

छत्रपतींचा पुतळा बसविण्यावरुन धुमश्चक्री; ग्रामीण पोलिसांचा लाठीहल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 08, 2021 11:42 AM

वैरागमध्ये संतप्त जमावाचा पोलीस ठाण्याला घेराव, वरिष्ठ पोलीस अधिकारी रवाना

वैराग/सोलापूर : प्रशासनाची परवानगी न घेता शासकीय जागेवर छत्रपती शिवाजी महाराजांचा दहा फूट उंचीचा अश्वारूढ पुतळा बसविल्यानंतर बार्शी तालुक्यातील वैराग येथे पोलीस आणि राजकीय कार्यकर्त्यांमध्ये मोठा गोंधळ झाला. संतप्त जमाव पोलीस ठाण्यासमोर जमल्यानंतर पोलिसांना लाठीहल्ला करावा लागला. घटनेत दहा ते बारा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

वैराग येथील शिवाजी चौकात छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा सोमवारी पहाटे बसविल्याचे समजताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. गर्दीला पांगविले. बळाचाही वापर केला. त्यानंतर माजी जिल्हा परिषद सभापती मकरंद निंबाळकर, माजी तालुका पंचायत सदस्य निरंजन भुमकर, माजी सरपंच संतोष निंबाळकर, उपसरपंच संजय भुमकर यांना पोलिसांनी चौकशी करण्याकरिता सकाळी ठाण्यात बोलाविले होते.

यावेळी राजकीय लोकप्रतिनिधी व पोलिसांमध्ये शाब्दिक बाचाबाची झाली. गोंधळ वाढताच ग्रामस्थांनी 'पोलीस अन्याय करत आहेत,' असे समजून पोलीस स्टेशनलाच घेरावा घातला. यावेळी जमावाला पांगविताना पोलिसांनी लाठीहल्ला केला. यात दहा ते बारा जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.  या प्रकारानंतर संतप्त ग्रामस्थांनी रस्त्यावरच ठिया करीत आंदोलन सुरू केले आहे. दरम्यान पोलीस उपअधीक्षक अभिजित धाराशिवकर तातडीने घटनास्थळी पोहोचले आहेत.

टॅग्स :SolapurसोलापूरCrime Newsगुन्हेगारीSolapur rural policeसोलापूर ग्रामीण पोलीसShivaji Maharajछत्रपती शिवाजी महाराज