हा रस्ता अनेक वर्षांपासून खड्डेयुक्त बनला होता. दरम्यान, गतवर्षी सुमारे तीन कोटींचे आर्थिक बजेट मंजूर होऊन तो मे महिन्यात पूर्ण झाला होता. मात्र, निकृष्ट कामामुळे रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडून उचकत आहे. हा रस्ता वैराग ते सुर्डी असा अकरा किलोमीटरचा पूर्ण केला आहे. अनेक ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष घालून संबंधित ठेकेदाराकडून रस्ता दुरुस्त करून घ्यावा, अशी मागणी होत आहे.
...................
वैरागपासून माढ्याकडे जाणारा ११ किलोमीटर लांबीच्या रस्त्याचे काम अंदाजे तीन कोटींचे असून, नुकताच हा रस्ता पूर्ण झाला आहे. मात्र, पावसामुळे काही ठिकाणी हा रस्ता खचत असून, खडी निघू लागली आहे. तरी संबंधित ठेकेदाराला सांगून रस्त्याची ताबडतोब दुरुस्ती केली जाईल.
-रशीद बिद्री, कनिष्ठ अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग