सोलापूर : गेल्या वर्षभरात वैराग पोलिस ठाणे हद्दीतून हरवलेले तसेच चोरी झालेल्या ५८ मोबाईल पैकी तीन लाख ९२ हजारांचे २८ मोबाईल शोधण्यात वैराग पोलिसांना यश आले आहे. संबंधितांना हे मोबाईल परत करण्यात आले आहेत.
पोलिस सूत्राकडील माहितीनुसार, वैराग पोलिस ठाणे हद्दीत गेल्या वर्षभरात गहाळ झालेले एकूण २८ मोबाईलचे तांत्रीक विषलेश्नाव्दारे शोध घेऊन तक्रारदार यांना पोलिस निरीक्षक निवृत्ती मोरे यांच्या हस्ते परत करण्यात आले.
ही कारवाई पोलिस अधिक्षक सरदेशपांडे, अप्पर पोलिस अधीक्षक प्रीतम यावलकर, उपविभागीय पोलिस अधिकारी जालिंदर नालकुल यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर सेलचे पोलीस निरीक्षक विकास दिंडुरे आणि त्यांच्या पथकाने केली. या कारवाईत पोहेकॉ अमोल भोरे, पोहेकॉ नागेश नाईकनवरे, पोकॉ स्वप्नील शेरखाने ,पोकॉ आकाश कांबळे, पोकॉ सुखदेव सलगर, पोकॉ शरद कांबळे तसेच सायबर पोलिस ठाण्याचे पोकॉ रतन जाधव, पोकॉ सचिन राठोड यांनी केली.