सोलापूर : सोलापुरातील महाविद्यालयांमध्ये सध्या व्हॅलेन्टाईन डेचा माहोल असून, युवक-युवती आपल्या मित्रांसोबत हा दिवस नेमका कसा साजरा करायचा, याचे प्लॅनिंग करण्यात मग्न आहेत. हे नियोजन करतानाच रोज डे, चॉकलेट डे, टेडी डेही साजरे करण्यात आले. कॉलेजच्या कट्ट्यांवर जमलेल्या विद्यार्थ्यांशी संवाद साधला असताना यंदाच्या ‘व्हॅलेंटाईन डे’ला थीम पार्टीज् आयोजित करण्याचे बहुतांश मुलांचे नियोजन असल्याचे समजले.
शहरातील प्रमुख महाविद्यालयांमध्ये मुला-मुलींमध्ये मोठा उत्साह दिसून आला. व्हॅलेंटाईन डेच्या सप्ताहातील रोज डे आणि चॉकलेट डे आम्ही मित्र-मैत्रिणींनी कॉलेजमध्येच साजरा केला; पण १४ फेब्रुवारीचा मुख्य दिवस एखाद्या हॉटेलमध्ये मोठे टेबल आरक्षित करून साजरा करणार आहोत, असे मुलांनी सांगितले.
व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी थीम पार्टीमध्ये नृत्य करण्यासाठी खास क्लास लावला आहे, असे नागेश पवार या विद्यार्थ्याने आपला प्लॅन उलगडून सांगितला. याशिवाय कँडल लाईट डीनरचे आयोजन केले असल्याचे काही मुलांनी आवर्जून सांगितले.
दरम्यान, गिफ्ट्स आर्टिकल्सच्या दुकानातही सध्या गर्दी वाढली असून, याच ठिकाणी ग्रीटिंग कार्डस्ही उपलब्ध करून ठेवण्यात आल्यामुळे मुले आपल्याला आवडेल, असा संदेश असलेले कार्ड शोधण्यात गर्क होती. ताजमहालची प्रतिकृती, राधा-कृष्णाची प्रतिमा, गॉगल्स, परफ्युम्स आदी गिफ्ट आर्टिकल्सना मागणी असल्याचे व्यावसायिकांनी सांगितले.
या वर्षी हटके सेलिब्रेशन करण्यासाठी थीम पार्टी आम्ही आयोजित केली आहे़ यासाठी क्लास लावून डान्सची प्रॅक्टिस केली आहे़ यामुळे यंदाचा व्हॅलेंटाईन डे खूप जल्लोषात आम्ही सर्व मित्र-मैत्रिणी साजरा करणार आहोत़ - नागेश पवार, तरुण
आपण आपल्या आयुष्यातील प्रत्येकाला एखादे तरी वचन देत असतो़ नाते टिकवण्यासाठी वचन देणे खूप महत्त्वाचे असते़ यासाठी हा दिवस साजरा केला जातो़ यामुळे एकमेकांवरील प्रेम टिकवून ठेवण्यासाठी हे गरजेचे आहे़ यामुळेच आम्ही या आठवड्यामधील हा दिवस तर नक्की साजरा करतो़ - स्नेहा लिंगशेट्टी, तरुणी
सध्या तरुणाईमध्ये व्हॅलेंटाईन डेची मोठी क्रेझ आहे़ हा आठवडा म्हणजे आपल्या जिवलग व्यक्तीवर प्रेम व्यक्त करण्याचा दिवस़ ज्या व्यक्तीला प्रेमाची गरज आहे त्या व्यक्तीसोबत हा दिवस साजरा करा़ यामुळे त्यांनाही आपण समाजाचा एक घटक असल्याची जाणीव होईल आणि आपल्यालाही एक नवा मित्र मिळेल़- वर्षा कणसे, तरुणी
१४ फेब्रुवारी रोजी आपल्या प्रिय व्यक्तीला स्वत:चा वेळ देऊन पाहा, भलेही ते कोणीही असो जोडीदार, मित्र, आई-वडील कोणीही, त्यावेळी त्यांच्या चेहºयावर आलेली खुशी तुमची व्हॅलेंटाईन गिफ्ट बनेल.- मुग्धा चव्हाण, तरुणी