मोडनिंब : वनिता विष्णू घाडगे (४५, रा. मोडनिंब, ता. माढा) यांचे निधन झाले. यांच्या पश्चात पती, दोन मुली, मुलगा असा परिवार आहे.
विजय गायकवाड
सोलापूर : विजय बाबूराव गायकवाड (७१, रा. संगमेश्वर नगर, अक्कलकोट रोड) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, तीन मुले, सुना व नातवंडे असा परिवार आहे.
सोमनाथ रामपुरे
सोलापूर : सोमनाथ सिद्धाराम रामपुरे (४०, रा. कसबा गणपती, बाळीवेस) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, वडील, पत्नी, मुलगा, दाेन बहिणी, मुलगा असा परिवार आहे.
शावरप्पा व्हनकडे
लिंबीचिंचोळी : शावरप्पा तोटप्पा व्हनकडे (७९, रा. लिंबीचिंचोळी, ता. दक्षिण सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुले, दोन मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. होटगी येथील एस.व्ही.सी.एस.प्रशालेतील सहशिक्षक राजशेखर व्हनकडे यांचे ते वडील होत.
मारुती काशीद
सोलापूर : मारुती बळीराम काशीद (७९, रा. हनुमान नगर, भवानी पेठ ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, तीन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.
विष्णू लोहार
नरखेड : विष्णू केरू लोहार (६७, रा. नरखेड, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, मुलगी, सुना, जावई व नातवंडे असा परिवार आहे. ते मंगळवेढ्यातील न्यू इंग्लिश स्कूल शिक्षण प्रसारक मंडळ संस्थेतून शिक्षक म्हणून सेवानिवृत झाले. १९८५ साली त्यांना महाराष्ट्राचा आदर्श शिक्षक पुरस्कार देऊन गौरवण्यात आले होते.
मुक्ताबाई मासाळ
लांबोटी : मुक्ताबाई सोमनाथ मासाळ (७२, रामहिंगणी, ता. मोहोळ) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात आई, पती, मुलगा, मुलगी, तीन भाऊ, तीन बहिणी, सून, जावई, नातवंडे असा परिवार आहे. मोहोळ तहसील कार्यालयातील चंद्रकांत मासाळ यांच्या त्या मातोश्री होत.
बाळकृष्ण व्यास
सोलापूर : राजस्थानी ब्राम्हण समाज संस्थेचे विश्वस्त पं. बाळकृष्ण जगन्नाथ व्यास (९१, रा. सोलापूर) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात नातू, पाच मुली असा परिवार आहे. ते दाधिच समाज संस्थेचे मार्गदर्शक होते. नागपूरचे आमदार गिरीष व्यास यांचे ते सासरे होत.