शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
2
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
3
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
4
'गद्दारांना तुरुंगात टाकू'; सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
5
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
6
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
7
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
8
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
9
Maharashtra Election 2024 Live Updates: अमित शाहांचा उद्धव ठाकरेंना सवाल; "खरी शिवसेना कधीही..."
10
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
11
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
12
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
13
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला
14
भाजपकडून मुख्यमंत्रिपदासाठी विनोद तावडे, पंकजा मुंडे, चंद्रशेखर बावनकुळेंचीही चर्चा
15
एकदम कडक! WhatsApp वर येणार दमदार फीचर; मेसेजची 'ही' मोठी समस्या होणार दूर
16
Raamdeo Agrawal on Share Market : शेअर बाजारातील घसरणीचा टप्पा हा तात्पुरता, परदेशी गुंतवणूकदार बाजारात परतणार : रामदेव अग्रवाल
17
Video: तेल, तूप, साखर, मीठ... खच्चून महिन्याला ५०० रुपये खर्च, वर १००० उरतात; कोल्हापुरात उमेदवाराच्या सुनेचे वक्तव्य 
18
विधेयक फाडलं अन् संसदेत केला आगळावेगळा डान्स; महिला खासदाराचा व्हिडिओ व्हायरल
19
भाजपाशी मतभेद, पण कुणी बोलायला तयार असेल तर...; उद्धव ठाकरेंनी घातली साद

वारी : भागवत धर्माचे भूषण

By admin | Published: July 01, 2016 8:18 PM

महाराष्ट्रात अस्तित्वात असणाऱ्या अनेक धर्म-पंथ-संप्रदायांपैकी भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय हाच प्रमुख सर्वंकष सर्वसमावेशक व अत्यंत लोकप्रिय असा संप्रदाय होय.

-  ह. भ. प. डॉ. अनंत भाऊराव बिडवे, बार्शी.

महाराष्ट्रात अस्तित्वात असणाऱ्या अनेक धर्म-पंथ-संप्रदायांपैकी भागवत धर्म म्हणजेच वारकरी संप्रदाय हाच प्रमुख सर्वंकष सर्वसमावेशक व अत्यंत लोकप्रिय असा संप्रदाय होय. त्याची सांस्कृतिक कामगिरी अत्यंत महत्त्वाची आहे. हा संप्रदाय केवळ महाराष्ट्रातच नाही तर महाराष्ट्राबाहेर मध्यप्रदेश, कर्नाटक, गुजरात, आंध्र प्रदेश अशा अनेक प्रांतांत विस्तार पावलेला आहे. कर्म, ज्ञान आणि ज्ञानोत्तर भक्तीचा उपदेश करून तात्त्विकदृष्ट्या अनन्य भक्तीला उच्चतम पातळीवर या संप्रदायाने नेले. या संप्रदायाला भागवत धर्म असे जरी आपण म्हणत असलो तरी शास्त्रात ज्या भागवत धर्माचे खंडन केले आहे त्या भागवत धर्मात वासुदेव, संकर्षण, प्रद्युम्न आणि अनिरुद्ध ही चतुर्व्यूह कल्पना प्रमुख आहे आणि तो भागवत धर्म बहुतांशी द्वैताकडे झुकणारा किंबहुना जीव आणि ईश्वर यांच्यात द्वैत प्रतिपादन करणारा आहे. याउलट महाराष्ट्रातील संतांनी ज्या भागवत धर्माचा पुरस्कार केला तो भक्तिप्रधान असला तरी नि:संशय अद्वैत मताचाच पुरस्कर्ता आहे. तसेच या वारकरी संप्रदायाची भक्तिकल्पना अद्वैत - ज्ञानोत्तर भक्ती अशी आहे. अशा या वारकरी संप्रदायाचे कपाळाला बुक्का, गळ्यात तुळशीची माळ ही बाह्य लक्षणे तर अखंड नाम:स्मरण नामचिंतन करीत सहिष्णुतायुक्त, सद्विचार, सदाचार आणि सद्उच्चार ही अंतर्लक्षणे महत्त्वाची मानली जातात. ज्याप्रमाणे साखरेने तोंड गोड होते त्याप्रमाणे तुळशीच्या माळेने बाह्यांग पवित्र होते. अशी श्रद्धा प्रत्येक वारकऱ्याची असते. यापैकी विशेष महत्त्वाचे लक्षण म्हणजे पंढरीची वारी होय. विठ्ठलाच्या वारकऱ्याची व्याख्या ज्ञानदेवांनी केली ते म्हणतात -काया वाचा मनें, जीवें सर्वस्वें उदार ।बापरखमादेवीवरू, विठ्ठलाचा वारीकर ।। (श्री संत ज्ञानदेव अभंग)वारी म्हणजे पुन्हा पुन्हा परमात्म्याच्या प्रेमानंदांची रुची चाखणे आणि कायिक, वाचिक आणि मानसिकदृष्ट्या मनाने, जीवाने किंबहुना सर्वस्वाने उदार होणारा तोच विठ्ठलाचा वारकरी होय.संत निवृत्तीनाथ म्हणतात - वैष्णवांचा मेळा सकळे मिळाला । विठ्ठल नाम काला पंढरीसी ।।वारकरी संप्रदायाची काल्याची संकल्पना खूप महत्त्वाची आहे. काला हा सर्वांचा मिळून असतो. तेथे कोणताही भेदाभेद नाही, उच्च-नीच भाव नाही, लहान-मोठा अधिकारी नाही, प्रत्येकाला ईश्वराची भक्ती करण्याचा अधिकार आहे, याचेच हे द्योतक आहे. वारकारी संप्रदायाच्या सामाजिक तत्त्वज्ञानाची ही महत्त्वाची उपयुक्तता आहे.श्री संत नामदेव महाराज म्हणतात -ह्यपाऊला पाऊली चालती मारग । उभा पांडुरंग मागे पुढे ।।ह्णवारीतला हा नामदेवांचा गोड अभंग आम्हाला जगण्याची प्रेरणा देतो. आपण आपल्या जीवनात दु:खांचा, कष्टांचा विचार न करता प्रत्येक पाऊल पुढेच टाकीत मार्गक्रमण करावे आणि मनात मात्र आपला रक्षणकर्ता तो पांडुरंग आपल्या मागे-पुढे उभा आहे, याची जाणीव नित्य असू द्यावी, हेच सांगतो.तेराव्या शतकातील संतश्रेष्ठ चोखामेळा म्हणतात-ह्यपंढरीचे वाटे येती वारकरी । सुखाची मी करी मात तयां ।माझ्या विठोबाचे गाती जे नाम । ते माझे सुखधाम वारकरी ।।ह्णयाठिकाणी संत चोखोबा वारकऱ्यांना सुखधाम वारकरी म्हणतात, याचा अनुभव वारीत चालत जाणाऱ्या प्रत्येक वारकऱ्याला आल्याशिवाय राहत नाही.शांतीब्रह्म श्रीसंत एकनाथ महाराज भागवतात म्हणतात-ह्यपावन पांडुरंग क्षिती । जे कां दक्षिण द्वारावरती ।जेथे विराजे श्रीविठ्ठलमूर्ती । नामें गर्जती पंढरी ।।(एकनाथी भागवत अ. २९ ओ. २४३)संत एकनाथ महाराज पंढरपूरला ह्यदक्षिण द्वारकाह्ण असे म्हणतात-जगद्गुरू श्री संत तुकाराम महाराज म्हणतात-पंढरीची वारी आहे माझ्या घरी । आणिक न करी तीर्थव्रत ।पंढरीसी नाही कोणां अभिमान । पाया पडे जन एकमेका ।।(संत तुकाराम)संत तुकाराम महाराज स्पष्ट करतात की, ज्याचे घरी पंढरीची वारी आहे, त्याला तीर्थ व्रते करण्याची गरज नाही. सहज, सुंदर आणि सोपा अध्यात्माचा मार्ग तुकारामांनी सांगितला. तसेच पंढरपूरला गेल्यानंतर अभिमान गळून पडतो, मी-तू पणाचा भेद शिल्लक राहत नाही. द्वैत संपून अद्वैतानुभूती येते आणि हे लोक एकमेकांच्या पाया पडतात. कारण, आम्ही वारकरी असे मानतो की, आता आम्हाला प्रत्यक्ष पांडुरंगाची पंढरपूरला आल्यानंतर भेट झाली. आता आमच्यात मी-तू पणाचा भेद राहिला नाही, माझ्या पाया पडून तू जसा माझ्यातल्या ईश्वराला नमस्कार करतोस तसेच मीही तुझ्या पाया पडून तुझ्यातल्या ईश्वराला नमस्कार करतो. वारीने अहंकार, अहंभाव, द्वैत, मत्सर, द्वेष, वासना इ. षड्रिपू गळून पडतात आणि खऱ्या मानवी जीवनाला सुरुवात होते.वारकरी संप्रदाय देव-भक्तांचे नाते हे माय-लेकांचे नाते मानतो. संत हे देवाकडे देव म्हणून न पाहता माय-बाप म्हणून पाहतात. कारण, एकदा का देव आणि भक्त हे नाते दृढ झाले की मग क्रियमाण, संचित, प्रारब्ध हा संसाराचा व्यापार सुरू होतो. ज्या मनात आई-बाप हाच एक विचार असतो ते मूल. मूल इकडून तिकडे पळते, पळताना पडण्याची भीती त्याला नसते तर त्याची भीती आईला असते. तसे हा भक्त किंवा वारकरी सुख-दु:खांच्या संसारात पळतो. पण स्वत: भीती बाळगत नाही. कारण, त्याची आई म्हणजे विठाई माऊली त्याची काळजी वाहते. संत निळोबाराय म्हणतात -प्रेमभातें तुम्हां हातीं । आम्ही नेणती भुकेलो ।ह्ण या प्रेमरस प्रतितीमध्ये वारकरी रममाण असतात, हे वारकारी संप्रदायाच्या अनुयायांचे महत्त्वाचे गुणवैशिष्ट्य होय.वारकरी संप्रदायाने बहुदेवतावादाला, कर्मकांडात्मक प्रवृत्तीला, अंधश्रद्धेला, पढिकतेला विरोध करून विवेक आणि नीतीला जीवनात स्थान देऊन डोळसपणाचा आग्रह धरला. सामाजिक विषमतेमुळे निर्माण झालेला समाजातील न्यूनगंड पूर्णपणे नाहीसा करून आध्यात्मिक अधिष्ठावर नवीन नीतिमूल्यांची जोपासना करून ती आबालवृद्धांपर्यंत समाजातल्या सर्व स्तरात कीर्तन, प्रवचन, भजने आदींच्या माध्यमातून पोहोचवण्याचा प्रयत्न करून सामाजिक प्रबोधनाचे आणि पुनरुत्थानाचे अनन्यसाधारण असे वारकारी संप्रदायाने कार्य केले.वारकरी संप्रदायाची अविभक्तं विभक्तेषुह्ण ही प्रवृत्ती, विश्वात्मक भाव ही प्रेरणा आणि शिवभावे जीवसेवा ही प्रकृती होय. वारकरी संप्रदायाने वेदांचा आदर केला. पण तसेच त्याला व्यवहाराची जोड दिली. तत्त्वज्ञानाला कृतिशीलतेची सांगड घातली. अद्वैतवादी विचारधन, एकनिष्ठ अनन्यभक्ती यांचा मानवी जीवनात संगम करून त्याला नैष्ठिक शुद्ध आचरणांची खंबीर बैठक दिली.तया सर्वात्मका ईश्वरा । स्वकर्म कुसुमांची वीरा ।पूजा केला होय अपारा । तोषालागी(ज्ञानेश्वरी)स्वत:च्या स्वकर्मरुपी कुसुमांनी, सर्वेश्वर परमात्म्याची पूजा करायची आणि अशाच पूजेने तो सर्वेश्वर प्रसन्न होतो ही शिकवण ज्ञानदेवांनी दिली आणि समस्त वारकरी संप्रदायाने ती शिरोधार्य मानली. यातूनच ह्यजन तेची जनार्दनह्ण ही मानवता धर्माची जीवननिष्ठा वारकरी संप्रदायाला लाभली. असा हा देवदुर्लभ वारसा आम्हाला आयता मिळाला याचे आम्ही पाईक आहोत. हेच पाईकपण मनात साठवून औदार्याची, मांगल्याची, श्रद्धेची आणि सेवेची परमपवित्र खूणगाठ बांधून आपले मानवी जीवन धन्य करणे, हाच या संतांच्या भूमीत जन्माला येऊन उतराई होण्याचा मार्ग होय.