सोलापूर : दिवाळी सुरु होते ती "वसु - बारस" या दिवसापासून. गाई-वासरंबददल कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आश्विन कृष्ण द्वादशीस, म्हणजेच गोवत्सद्वादशीस साजरा केला जातो.
हिंदू धर्मात गाईला महत्वाचे स्थान आहे. तिचा सन्मान म्हणून या दिवशी गाई व वसरासासह पूजा केली जाते. त्याच अनुषंगाने आज सोलापूर महानगरपालिकेच्या वतीने प्रतिवर्षाप्रमाणे यंदाही महापालिकेच्या आवारामध्ये "वसु - बारस" निमित्ताने महापौर श्रीकांचना यन्नम यांच्या हस्ते गो मातेचे व वासराचे पूजन करण्यात आले.
यावेळी सभागृह नेते शिवानंद पाटील, महिला व बालकल्याण सभापती कल्पना कारभारी, परिवहन सभापती जय साळुंखे, उपायुक्त धनराज पांडे, सहाय्यक आयुक्त पुष्पगंधा भगत, नगरसेविका मिनाक्षी कंपली, नगरसेविका संगीता जाधव, नगरसेविका रामेश्वरी बिरू, नगरसेविका अंबिका पाटील, नगरसेविका निर्मला तांबे, नगरसेविका राजेश्री कणके आदी मान्यवर उपस्थित होते.