सोलापूर : किर्लोस्कर उद्योग समूह व सृजन फिल्म सोसायटीच्या संयुक्त विद्यमाने २४ ते २७ जुलैदरम्यान येथे ‘वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’चे आयोजन केले असल्याची माहिती ‘किर्लोस्कर’चे वरिष्ठ सरव्यवस्थापक डॉ. एस. पी. वैद्य यांनी आज पत्रपरिषदेत दिली. किर्लोस्कर समूहाच्या वतीने सहा राज्यातील २८ शहरांमध्ये हा महोत्सव होणार असून, या उपक्रमाचा प्रारंभ सोलापूरपासून होईल, असे डॉ. वैद्य यांनी सांगितले.डॉ. फडकुले सभागृहात हा चित्रपट महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. गुरुवार, दि. २४ जुलै रोजी फोटो फिल्म कार्यशाळेने उद्घाटन होणार आहे. ‘फाइव्ह आर स्मॉल एफर्ट, बिग डिफरन्स’ हे या महोत्सवाचे बोधवाक्य आहे. ‘फाइव्ह आर’मध्ये रिफ्यूज, रिड्यूस, रियूज, रिसायकल, रिकव्हर यांचा समावेश आहे. गेल्या पाच वर्षांपासून येथे हा महोत्सव आयोजित होत आहे. सोलापूर विद्यापीठ, लोकमंगल प्रतिष्ठान, शासनाचा वनीकरण विभाग, हरितक्रांती सेना, रोटरी क्लब, इन्टॅक्ट आणि शाळा व महाविद्यालयांचे महोत्सवाला सहकार्य लाभणार आहे. महोत्सवातील प्रवेश विनामूल्य आहे, अशी माहिती डॉ. वैद्य यांनी दिली.यंदाच्या महोत्सवात आंतरराष्ट्रीय स्तरावर गाजलेले भारत, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, आॅस्ट्रेलिया, इजिप्त, मेक्सिको, इंग्लंड, अमेरिका, दक्षिण आफ्रिका, केनिया, जपान, टांझानिया, मंगोलिया या देशांतील चित्रपट दाखविण्यात येणार आहेत. याशिवाय ‘पर्यावरण माझ्या नजरेतून आणि माझं सोलापूर (चांगलं/ वाईट) या विषयावर छायाचित्र स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. ३०० रिझुलोशनमध्ये ८ बाय १० इंच या साईजमध्ये छायाचित्रे पाठवावीत, असे आवाहन त्यांनी केले. आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी प्रश्नमंजुषा, हसत खेळत पर्यावरण, पथनाट्य स्पर्धा, नेचर व हेरिटेज वॉक आदी उपक्रमही होणार आहेत. यावेळी वीरेंद्र चित्राव, सृजनचे अमोल चाफळकर, सोलापूर विद्यापीठाच्या वृत्तविद्या विभागाचे डॉ. रवींद्र चिंचोलकर, बाबुराव पेठकर, किर्लोस्कर समूहाचे ऋषीकेश कुलकर्णी आदी उपस्थित होते. -----------------------महोत्सवाचे स्वरूप२४ जुलै - महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी पोस्टर्स, पॉवर पॉइंट प्रेझेंन्टेशन२५ जुलै - पर्यावरण दिंडी, वसुंधरा मित्र पुरस्काराचे वितरण२६ जुलै - चित्रपट प्रदर्शन, अन्य स्पर्धा२७ जुलै - ‘फाइव्ह आर’वर प्रियदर्शिनी कर्वे यांची कार्यशाळा, समारोप---------------------------कॅरिबॅगमुक्त सोलापूरवसुंधरा चित्रपट महोत्सवाच्या निमित्ताने ‘कॅरिबॅगमुक्त सोलापूर’ ही मोहीम राबविण्यात येणार असून, मायक्रॉन प्लास्टिकमुळे जलवाहिन्या तुंबणे, प्राण्यांचे मृत्यू अशा घटना घडत आहेत. त्यामुळे आम्ही ही चळवळ राबवित आहोत, असे संयोजक वीरेंद्र चित्राव यांनी सांगितले.इको रेंजर्स-इको रेंजर्स हा उपक्रम यंदाच्या वर्षापासून पुणे येथे राबविण्यात येईल. शहरातील महाविद्यालयांमधील दहा विद्यार्थ्यांची निवड करून त्यांच्या माध्यमातून पर्यावरण
वसुंधरा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव
By admin | Published: June 24, 2014 1:26 AM