वीर धरणामध्ये भाटघर, नीरा-देवधर व गुंजवणी या तीन धरणांमधून पाणी येते. त्यामुळे वीर धरणाचा पाणीसाठा झपाट्याने वाढत आहे. वीर धरण जवळजवळ पूर्ण म्हणजे ९८.१९ टक्के भरले आहे. चारही धरणे सरासरी ७७ टक्के भरली असून ३७ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला आहे. गतवर्षी सरासरी चार धरणे ३६ टक्के भरली होती. वीर धरण गतवर्षीपेक्षा चालू वर्षी ६० टक्केपेक्षा जास्त क्षमतेने भरले आहे. वीर धरणामध्ये आजअखेर एकूण पाणीसाठा ५७९.८५ द.ल.घ.मी., उपयुक्त पाणीसाठा ५७१.६२ द.ल.घ.मी. असून पाणीपातळी ५७९.६९ मीटर आहे.
तीन तालुक्याच्या शेतीला संजीवनी
धरण क्षेत्रात यंदा चांगला पाऊस झाला. त्यामुळे गुंजवणी, नीरा-देवधर आणि भाटघर धरणातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे. वीर धरण परिसरात यंदा जेमतेम पाऊस झाला. मात्र धरणात सोडलेल्या पाण्यामुळे पाणीपातळीत वाढ झाली आहे. वीर धरणात गतवर्षीपेक्षा लवकर पाणी जमा झाल्याने नीरा नदीतून पाणी वाहत आहे. त्यामुळे माळशिरस, पंढरपूर व सांगोला तालुक्यातील शेतीला संजीवनी मिळणार आहे.
वीर, भाटघर, नीरा-देवधर, गुंजवणी धरणाची स्थिती
वीर धरण
पावसाची नोंद : २४१ मिमी.
टक्केवारी : ९.१७ टीएमसी पाणी ९८.१९ टक्के.
गतवर्षी टक्केवारी : ३.६६ टीएमसी पाणी ३८.८८ टक्के.
भाटघर धरण :
पावसाची नोंद : ४५३ मिमी.
टक्केवारी : १४.४१ टीएमसी पाणी ६१.३० टक्के.
गतवर्षी टक्केवारी : ९.०७ टीएमसी पाणी ३८.५६ टक्के.
निरा देवधर :
पावसाची नोंद : १५५७ मिमी.
टक्केवारी : १०.३४ टीएमसी पाणी ८८.१९ टक्के.
गतवर्षी टक्केवारी : २.८३ टीएमसी पाणी २४.१२ टक्के.
गुंजवणी धरण :
पावसाची नोंद : ११८२ मिमी.
टक्केवारी : ३.१९ टीएमसी पाणी ८६.६६ टक्के.
गतवर्षी टक्केवारी : १.८१ टीएमसी पाणी ५१.७२ टक्के.