वाळवा : येथे पार पडलेल्या राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेतून दि. ३ ते ७ जानेवारीअखेर बालेवाडी (जि. पुणे) येथे होणाऱ्या राष्ट्रीय स्पर्धेसाठी राज्य मुले-मुलींच्या संघांची निवड करण्यात आली. मुलांच्या संघाचे नेतृत्व वाळव्याचा वीरधवल नायकवडी, तर मुलींच्या संघाचे नेतृत्व सोनाली हेळवी (सातारा) करणार आहे.वीरधवल वैभव नायकवडी (कर्णधार, वाळवा-सांगली), प्रज्ज्वल प्रभाकर भोयर (नागपूर), शुभम संग्राम माने (कोल्हापूर), मन्सूर एजाज जलील (नाशिक), महेश प्रवीण भंडळकर (पुणे), वैभव राजकुमार फुटभारी (अहमदनगर), रोहित तुकाराम मांजरे (पुणे), केतन किरण पाटील (कोल्हापूर), गणेश महादेव ठाकरे (वाशिम), विवेक गणेश थळे (रायगड) यांची, तर मुलींच्या संघात सोनाली रामचंद्र हेळवी (कर्णधार, सातारा), अपूर्वा भरत मुरकुटे (पुणे), काजल सतीश इंगळे (सातारा), प्राजक्ता अनिल ठोंबरे (सांगली), पूनम सुग्रीव ओव्हाळ (उस्मानाबाद), स्नेहल बाळासाहेब खंडागळे (पुणे), प्रतिज्ञा दीपक तेलगोटे (अकोला), पूजा लक्ष्मण मुटकुळे (बीड), आँचल विलास घाईत (चंद्रपूर), गौरी सुभाष निकम (सांगली) यांची राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. ही निवड जिल्हा क्रीडाधिकारी युवराज नाईक, सहायक जिल्हा क्रीडाधिकारी शंकर भास्करे यांच्या नेतृत्वाखालील निवड समिती सदस्य अजय पवार (बीड), विजय खोकले (गडचिरोली), श्रीमती गुणवंती जरांडे (रत्नागिरी) यांनी केली. यावेळी आमसिध्द सोलनकर, प्रकाश मेटकरी, महावीर वाजे उपस्थित होते. (वार्ताहर)
वीरधवल नायकवडी राज्य संघाचा कर्णधार
By admin | Published: December 30, 2014 11:05 PM