पोलीस निरीक्षक विनय बहिर यांच्या नेतृत्वाखाली सहायक निरीक्षक महारूद्र परजणे यांच्या पथकाने कारवाई केली.
पोलीस सूत्राकडील माहितीनुसार, मंगळवारी मध्यरात्री एक वाजता साकत (ता. बार्शी) येथे भोगावती नदीपात्रातून बेकायदेशीररीत्या वाळू चोरून घेऊन जाताना आढळले. या कारवाईत आठ लाखांचा ट्रक, २१ हजारांची तीन ब्रास वाळू असा आठ लाख २१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. याबाबत सतीश भगवान गाडे व सतीश गणपत हजारे (दोघे रा. पानगाव, ता. बार्शी) या दोघांविरोधात पोलीस काॅन्स्टेबल सदाशिव केंद्रे यांनी फिर्याद दिली आहे.
तसेच इर्लेवाडी येथे भोगावती नदीपात्रातून मंगळवारी मध्यरात्री कुंडलिक बलटू मेरडे हा नंबर नसलेल्या ट्रॅक्टरमधून वाळू चोरून नेत असताना पकडला गेला. याबाबत पोलीस काॅन्स्टेबल अमितराव घाडगे यांनी वैराग पोलीस स्टेशनला फिर्याद दिली आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक महारुद्र परजणे करीत आहेत.
---