विठ्ठल खेळगीपंढरपूर : सीसीटीव्ही अन् सायरनचे कनेक्शन कट करून गादेगाव (ता. पंढरपूर) येथील विदर्भ कोकण ग्रामीण बँक फोडल्याची घटना घटली आहे. चोरांनी अंदाजे अडीच लाखांची रक्कम व २ लाख रुपयांचे सोने पळवून नेल्याची घटना सोमवारी समोर आली आहे.
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी २३ तारखेला संध्याकाळी ६ वाजता बँक बंद केल्यानंतर सोमवारी सकाळी साडेनऊ वाजता उघडायला आले होते. त्यावेळी त्यांना ही घटना लक्षात आली. घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक धनंजय जाधव यांनी पथकासह घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
चोरांनी बँकेत आत आल्यानंतर मेन पॉवर सप्लाय डिस्कनेक्ट केला. तसेच सीसीटीव्ही कनेक्शन कट केले. सायरनचे कनेक्शन कट केलेले आहे. यानंतर गॅस कटरने सेफ कट करून अडीच लाखांची रुपयांची रक्कम व साधारण २ लाख रुपयांचे सोने चोरी केली असल्याचे प्रथम दर्शनी समोर येत आहे.