शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
2
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
3
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
4
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
5
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
6
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
7
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
8
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
9
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
10
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
11
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
12
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
13
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
14
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
15
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
16
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
17
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?
18
"EVM बाबत माहिती नाही, पण लोक सांगतात की..."; पराभवानंतर शरद पवारांचे मोठं विधान
19
महायुतीच्या विजयात CM योगींची किती मोठी भूमिका? चंद्रशेखर बावनकुळे म्हणतात...

व्हिडिओ व्हायरल... पोलीस पैशासाठी अडला, दुचाकीस्वार नग्न होऊन नडला

By ऑनलाइन लोकमत | Published: July 07, 2021 11:55 AM

आपल्या दुचाकीवरुन गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाकडे ट्रॅफिक हवालदाराने पैशांची मागणी केली होती. त्यामुळे, पीडित दुचाकीस्वाराने चक्क मुन्नभाई एमबीबीएस चित्रपटाप्रमाणे गांधीगिरी करत अंगावरील सगळे कपडे उतरले होते

ठळक मुद्देपोलिसांची बदनामी होऊ नये म्हणून संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन सत्यता पडताळण्यात येईल. संबंधीत रस्त्यावरील वाहतूक पोलिसांकडेही चौकशी करण्यात येत आहे.

सोलापूर - ट्रॅफिक पोलीस आणि वाहनचालक यांचा वाद नवीन नाही, बरेचदा या वादातून भांडण, हाणामारी झाल्याच्याही घटना घडल्या आहेत. कोरोना लॉकडाऊन काळात तर पोलीस अन् सर्वसामान्यांच्या वादाचे कित्येक व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. सध्याही राज्यात काही निर्बंध लादण्यात आले आहेत. त्यामुळे अजूनही पोलिसांसोबत नागरिकांचा वाद होतोच. सध्या सोलापूरातील असाच एक ट्रॅफिक पोलीस आणि एका नागरिकाचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

आपल्या दुचाकीवरुन गॅस सिलेंडर घेऊन जाणाऱ्या वाहनचालकाकडे ट्रॅफिक हवालदाराने पैशांची मागणी केली होती. त्यामुळे, पीडित दुचाकीस्वाराने चक्क मुन्नभाई एमबीबीएस चित्रपटाप्रमाणे गांधीगिरी करत अंगावरील सगळे कपडे उतरले होते. सोलापूर शहरातील सातरस्ता परिसरातील पत्रकार भवन येथे हा प्रकार घडला आहे. वाहतूक पोलिसाने अडवून पैशांची मागणी केल्याने पोलीस आणि नागरिकामध्ये शाब्दीक वाद झाला. त्यानंतर, पीडित व्यक्तीने अंगावरील कपडे काढून रस्त्यावरच नग्न झाल्याचं व्हिडिओत दिसत आहे. त्यानंतर, पोलीस शिपायाने घटनास्थळावरुन धूम ठोकली आहे. 

शहरातील गॅस गोडावूनमधून संबंधित व्यक्ती गॅस सिलेंडर घेऊन घराकडे जात होती. त्यावेळी, वाहतूक पोलिसाने दुचाकीस्वारास हटकले व मास्क नसल्याचे सांगत पैशांची मागणी केली. त्यावेळी, मास्क घालेन नाहीतर कपडे काढून फिरेन तुम्हाला काय करायचंय, असा प्रतिप्रश्न व्यक्तीने केला. त्यावेळी, पोलिसानेही कपडे काढा नाहीतर काहीही करा, पण मास्क नसेल तर पावती फाडा, अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर, संबंधित व्यक्ती कपडे काढून नग्नावस्थेत रस्त्यावर उभा राहिला. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. 

पोलिसांची बदनामी होऊ नये म्हणून संबंधित व्यक्तीचा शोध घेऊन सत्यता पडताळण्यात येईल. संबंधीत रस्त्यावरील वाहतूक पोलिसांकडेही चौकशी करण्यात येत आहे. वाहतूक पोलीसाने चौकशीत अवैध्यरित्या पैशांची मागणी केल्याचे सिद्ध झाल्यास कारवाई करण्यात येईल, असे पोलीस उपायुक्त डॉ. दिपाली धाटे-घाडगे यांनी म्हटले आहे. मात्र, प्राथमिक माहितीनुसार दुचाकीस्वाराने मास्क घातला नव्हता आणि दंडाच्या रकमेची मागणी केल्यानंतर उद्धट वर्तन केल्याचे सांगण्यात आले आहे, असेही धाटे यांनी म्हटले.  

टॅग्स :Solapurसोलापूरcorona virusकोरोना वायरस बातम्याPoliceपोलिसTrafficवाहतूक कोंडी