सांगोला - नुकताच भाजपात प्रवेश केलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी खासदार रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मनातून अजूनही घड्याळावरचं प्रेम कमी झाल्याचं दिसत नाही. सांगोला येथील प्रचारसभेत भाषणाच्या ओघामध्ये रणजितसिंह मोहिते पाटील यांनी मतदारांना येत्या 23 एप्रिल रोजी घड्याळाला असा उल्लेख केल्याने पंचाईत झाली आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतोय.
माढ्याचे भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना युतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारसभेसाठी रणजितसिंह मोहिते पाटील यांनी सभा घेतली. सांगोला येथे प्रचारसभेत ते उपस्थितांना संबोधित करत होते. राष्ट्रवादी काँग्रेस सोडल्यानंतरही रणजितसिंहांच्या ओठांवर अजूनही घड्याळच असल्याचं या व्हिडीओतून पाहायला मिळालं. प्रचारात बोलताना रणजितसिंह पाटील म्हणाले की, आपल्या पाण्याला ज्यांनी विरोध केला त्यांना आपण विरोध केलाच पाहिजे. ज्यांनी आपल्या पाण्याला पाठिंबा दिला आहे, जे भविष्यात आपल्या पाण्याचा प्रश्न सोडवणार आहेत अशांच्या मागे आपण उभं राहिलं पाहिजे. त्यामुळे येत्या 23 एप्रिल रोजी आपलं घड्याळं हे चिन्ह अशी चूक केली. मात्र ही चूक लक्षात रणजितसिंह मोहिते पाटलांनी हात जोडले असा हा व्हिडीओ आहे. मात्र रणजितसिंह यांच्या चुकीमुळे उपस्थितांमध्ये मोठा हशा पिकला.
दरम्यान, माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस आघाडीकडून संजय शिंदे आणि भाजप-शिवसेना युतीकडून रणजितसिंह मोहिते पाटील निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माढ्याचे खासदार विजयसिंह मोहिते-पाटील यांचे पुत्र रणजितसिंह मोहिते-पाटील यांनी काही दिवसांपूर्वीच भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला. विशेष म्हणजे रणजितसिंह मोहिते-पाटलांबरोबरच धैर्यशील मोहिते-पाटलांनीही भाजपात प्रवेश केला. यावेळी माळशिरस पंचायत समिती सभापतींसह अन्य पदाधिकारीही भाजपात डेरेदाखल झाले आहेत.
सातारा, सोलापूर, अकलूज येथील राष्ट्रवादीचे असंख्य कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी रणजितसिंह मोहिते-पाटलांबरोबरच भाजपामध्ये प्रवेश केला. त्यावेळी जवळपास 12 ते 14 वर्षांपासून मुख्यमंत्री आणि माझ्यात आपुलकीचं नातं आहे. माढा मतदारसंघात राष्ट्रवादीचे खासदार असताना भाजपाने माढा मतदारसंघात अनेक रस्त्यांची कामे केली, भाजपावाले पक्ष बाजूला ठेवून काम करत असल्याचंही रणजितसिंह मोहिते-पाटलांनी मुख्यमंत्र्यांवर स्तुतिसुमनं उधळली होती.
पाहा व्हिडीओ