शीतलकुमार कांबळे, सोलापूर : विजापूर रोडवरील आयटीआयसमोर मोठ्या प्रमाणात भाजी विक्रेते फुटपाथवर बसतात. गुरुवार २० जून रोजी संध्याकाळी महापालिकेकडून कारवाई करण्यात आली. त्यामुळे हा रस्ता मोकळा झाला.
आयटीआय समोर मोठ्या प्रमाणत भाजीविक्रेते भाजी विक्री करण्यासाठी रोडवर बसतात. या संदर्भात अनेकदा तक्रारी करण्यात आल्या. महापालिका तसेच पोलिस प्रशासनाकडून अनेकदा कारवाई झाली. पोलिस व महापालिकेचे कर्मचारी निघून गेले की पुन्हा भाजी विक्री होते. याबाबत पुन्हा तक्रारी आल्याने गुरुवारी महापालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक आले होते.
महापालिकेचे वाहन आल्याचे पाहताच भाजी विक्रेत्यांनी पळ काढला. उशीरापर्यंत महापालिकेचे वाहन व कर्मचारी तिथे होते. त्यामुळे फुटपाथवर भाजी विक्री झाली नाही. काही भाजी विक्रेते चैतन्य नगर येथील भाजी मंडईत भाजी विक्री करण्यासाठी निघून गेले. त्यामुळे विजापूर रोड मोकळा झाला.